IPL 2023 : खत्म-टाटा-बाय-बाय... या 10 खेळाडूंची अखेरची आयपीएल स्पर्धा!
IPL 2023 : काही खेळाडू निवृत्त होऊ शकतात.. तर काही खेळाडू लिलावात अनसोल्ड राहू शकतात.. पाहूयात त्या खेळाडूबद्दल...
Indian Premier League 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम उत्तरार्धाकडे झुकलाय.. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. त्याशिवाय धोनीच्या फलंदाजानी सर्वांनाच चकीत केलेय.. काही खेळाडूंना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. सध्या खेळत असलेले काही खेळाडू पुढील वर्षी खेळताना दिसण्याची शक्यता कमीच आहे. काही खेळाडू निवृत्त होऊ शकतात.. तर काही खेळाडू लिलावात अनसोल्ड राहू शकतात.. पाहूयात त्या खेळाडूबद्दल...
1- मनीष पांडे
मधल्याफळीतील मनीष पांडे यंदा दिल्लीच्या संघाचा सदस्य आहे. 33 वर्षीय मनीष पांडे याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या हंगामात मनीष पांडे याला फक्त 20 च्या सरासरीने धावा काढता आल्या आहेत. मनीष पांडेचे वाढते वय अन् फॉर्म पाहाता पुढील वर्षी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता कमीच आहे.
2- डेविड वॉर्नर
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व डेविड वॉर्नर करत आहे. वॉर्नर याला फलंदाजीत आणि नेतृत्वात चांगली कामगिरी करता आली नाही. वॉर्नर फलंदाजीत अपयशी ठरलाय. सुरुवातीला धावा काढल्या पण धावगती संथ होती. त्यामुळे वाढते वय आणि फॉर्म पाहता वॉर्नर पुढच्या हंगामात खेळणार का ? हा प्रश्न उपस्थित राहतोय.
3- अंबाती रायडू
चेन्नईचा स्टार खेळाडू अंबाती रायडूला लौकिकसा साजेशी फलंदाजी करताना आली नाही. 38 वर्षीय रायडूने फक्त 16 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. रायडू निवृत्ती घेऊ शकतो..
4- सुनील नारायण
कोलकात्याचा फिरकी गोलंदाज सुनील नारायणला प्रभावी गोलंदाजी करता आली नाही. नारायण याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला आतपर्यंत फक्त सात विकेट घेता आल्यात... 35 वर्षीय नारायणला कोलकाता रिलीज करु शकतो.
5- अमित मिश्रा
लखनौचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा पुढील वर्षी खेळण्याची शक्यता कमीच आहे. 41 वर्षीय अमित मिश्रा याने फक्त सहा विकेट घेतल्या आहेत.
6- पीयूष चावला
पीयूष चावलाने यंदा दमदार कामगिरी केली आहे. चावलाने आतापर्यंत 17 विकेट घेतल्या आहेत. पण वाढत्या वयामुळे मुंबई त्याला रिटेन करणार का ? असा सवाल उपस्थित होतोय..
7- केदार जाधव
आरसीबीने रिप्लेसमेंट म्हणून केदार जाधव याला संघात स्थान दिलेय. समालोचन करणारा केदार आयपीएलमध्ये खेळत आहे. पण पुढील वर्षी तो खेळताना दिसण्याची शक्यता कमीच आहे. 38 वर्षीय केदार जाधवला आरसीबी रिटेन करण्याची शक्यता नाही.
8- दिनेश कार्तिक
आरसीबीचा स्टार खेळाडू दिनेश कार्तिक याला यंदा दमदार कामगिरी करता आली नाही. 38 वर्षीय कार्तिकला आरसीबी रिटेन करण्याची शक्यता आहे. आरसीबीचा संघ अडचणीत असताना कार्तिकला मोठी खेळी करता आलेली नाही. वाढते वय आणि फॉर्म पाहता पुढील वर्षी कार्तिक खेळताना दिसण्याची शक्यता कमीच आहे.
9- वृद्धिमान साहा
गुजरातचा सलामी फलंदाज वृद्धिमान साहा दमदार लयीत दिसतोय.. पावरप्लेमध्ये साहा धावांचा पाऊस पाडतोय.. पण 39 वर्षीय साहाला गुजरात रिटेन करण्याची शक्यता कमीच आहे.
10- मोईन अली
36 वर्षीय मोईन अली याला यंदा लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीत त्याला प्रभावी मारा करता आला नाही. त्याने आतापर्यंत 114 धावा केल्या आहेत.. त्याशिवाय 9 विकेट घेतल्यात.. वाढते वय आणि फॉर्म पाहता पुढील वर्षी चेन्नई मोईन अली याला रिटेन करण्याची शक्यता कमीच आहे.