एक्स्प्लोर

PBKS vs RCB, Match Highlights: विराट-फाफची अर्धशतके, सिराजचा भेदक मारा; आरसीबीचा पंजाबवर रॉयल विजय

IPL 2023, PBKS vs RCB: विराट कोहली आणि फाफ डु प्लेलिस यांच्या वादळी अर्धशतकानंतर मोहम्मद सिराज याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर आरसीबीने पंजाबचा पराभव केला आहे.

IPL 2023, PBKS vs RCB: विराट कोहली आणि फाफ डु प्लेलिस यांच्या वादळी अर्धशतकानंतर मोहम्मद सिराज याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर आरसीबीने पंजाबचा पराभव केला आहे. 174 धावांचा बचाव करताना आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. पंजाबचा संपूर्ण डाव 150 धावांत संपुष्टात आला. पंजाबकडून प्रभसिमरन आणि जितेश शर्मा यांनी झुंज दिली. पण इतर फंलदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. 

आरसीबीने दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. अथर्व तायडे  पुन्हा एकहा फ्लॉप गेलाय. शिखर धवनच्या अनुपस्थितीत सलामीला येणाऱ्या अथर्व याला मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. मोहम्मद सिराज याने अथर्व याला चार धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर मॅथ्यू शॉर्टही 8 धावा काढून तंबूत परतला. लियाम लिव्हिंगस्टोन यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो फक्त दोन धावा काढून बाद झाला. हरप्रीत सिह 13 धावांवर धावबाद झाला. कर्णधार सॅम करन 10 धावा काढून बाद झाला... शाहरुख खान याला 7 धावांचे योगदान देता आले. हरप्रीत ब्रार 13 आणि नॅथन इलिस एक धाव काढून बाद झाले. 

जितेश शर्मा आणि प्रभसिमरन यांनी झुंज दिली. सुरुवातीला प्रभसिमरन याने आरसीबीच्या गोलंदाजांचा सामना केला. प्रभसिमरन याने 30 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने चार षटकार आणि तीन चैकार लगावले. तर मराठमोळ्या जितेश शर्मा याने 41 धावांचे योगदान दिलेय. जितेश शर्मा याने 27 चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. जितेश शर्मा प्रभसिमरन यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावांचा पल्ला पार करता आला नाही. हरप्रीत सिंह, सॅम करन यांना चांगली सुरुवात मिळाली पण मोठी खेळी करता आली नाही. 

मोहम्मद सिराज याने आज भेदक गोलंदाजी केली. पावरप्लेमध्ये दोन विकेट घेतल्या.. आणि अखेरच्या षटकात दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज याने चार षटकात 21 धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले. त्याशिवाय वानंदु हसरंगा याने दोन विकेट घेतल्या. वेन पार्नेल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना फाफ डु प्लेसिस आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात 174 धावांपर्यंत मजल मारली.  
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने आज अर्धशतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील विराट कोहलीचे हे चौथे अर्धशतक होय. विराट कोहलीने 47 चेंडूत 59 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी 137 धावांची सलामी दिली. विराट कोहलीने संयमी फलंदाजी करत फाफ याला साथ दिली. विराट कोहलीने याने यंदाच्या आयपीएलमध्ये सहा डावात चार अर्धशतके झळकावली आहेत. मुंबई, लखनौ, दिल्ली आणि पंजाब संघाविरोधात विराट कोहलीने अर्धशतके झळकावली आहेत. तर कोलकाताविरोधात 21 धावांची खेळी केली होती. चेन्नईविरोधात विराट कोहलीला फक्त सहा धावांचे योगदान देता आले. 

फाफची कर्णधाराला साजेशी खेळी - 
फाप डु प्लेसिस याने आक्रमक फलंदाजी करत पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले. सहा डावात चौथे अर्धशतक झळकावत फाफने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. फाफ डु प्लेसिस याने आज 56 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच षटकार आणि पाच चौकार लगावले. फाफ डु प्लेसिस याने 150 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. फाफ आज इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला होता.. चोहोबाजूने फटकेबाजी करत फाफने इम्पॅक्ट दाखवला. फाफ डु प्लेसिस याने 300 धावांचा पल्लाही पार केलाय. सध्या तो सर्वाधिक धावसंख्या काढणाऱ्या फलंदाजात पहिल्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. 

विराट-फाफची दमदार सलामी - 
कर्णधार विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी आज पुन्हा एकदा दमदार सलामी दिली. दोघांनी 16 षटकात 137 धावांची सलामी दिली. 98 चेंडूत 137 धावांची सलामी दिली. यामध्ये विराट कोहलीचे योगदान 59 धावांचे होते. तर फाफचे योगदान 71 धावांचे... विराट आणि फाफ यांनी चांगल्या चेंडूला सन्मान दिला.. तर खराब चेंडूचा समाचार घेतला. दोघांनीही संयमी फलंदाजी करत आरसीबीच्या डावाला आकार दिला. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. पण अखेरच्या षटकात आरसीबीने लागोपाठ विकेट फेकल्या. विराट कोहली बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलही लगेच तंबूत परतला. विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांना हरप्रीत ब्रार याने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर जम बसलेला फाफही बाद झाला.. एलिसने फाफचा अडथळा दूर केला. लागोपाठ विकेट पडल्यामुळे आरसीबीची धावसंख्येला खिळ बसली. दिनेश कार्तिक याला अखेरच्या षटकात धावा करता आल्या नाहीत. तो पुन्हा अपयशी ठरला... कार्तिकने पाच चेंडूत सात धावांचे योगदान दिले. शाहबाद अहमद आणि महिपाल लोमरोर यांनी अखेरच्या षटकात धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला.  

पंजबाकडून हरप्रीत ब्रार याला सर्वाधिक दोन विकेट मिळाल्या. तर नॅथन इलिस याला एक विकेट मिळाली. पण या दोन्ही गोलंदाजांनी धावा खूप खर्च केल्या. हरप्रीत ब्रार याने तीन षटकात 31 धावा खर्च केल्या. तर नॅथन इलिस याने चार षटकात 41 धावा खर्च केल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Embed widget