(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL2023 RCB vs DC: आरसीबीची प्रथम फलंदाजी, दोन्ही संघात बदल, पाहा प्लेईंग 11
IPL2023 DC vs RCB: दिल्ली आणि आरसीबीमध्ये लढत.. कोण मारणार बाजी?
IPL2023 RCB vs DC : एम. चिन्नास्वामी स्टेडिअम स्टेडिअमवर दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबी प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघात एक एक बदल करण्यात आला आहे. मिचेल मार्शची दिल्लीमध्ये एन्ट्री झाली आहे तर आरसीबीच्या ताफ्यात वनुंदा हसरंगा दाखल झालाय. दिल्ली संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे तर आरसीबी लागोपाठ दोन पराभवानंतर विजयी पटरीवर परतण्यासाठी मैदानात उतरले. दोन्ही संघातील ही लढत तुल्यबळ होण्याची शक्यता आहे.फ्लॉप फलंदाजी ही दिल्लीची अडचण आहे तर गोलंदाज धावा देतात ही आरसीबीची कमकुवत बाजू आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज बंगळुरु येथे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आरसीबीचा हा चौथा सामना असेल, तर दिल्लीचा हा पाचवा सामना असेल. यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी आरसीबी संघाने एक सामना जिंकला तर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे दिल्ली संघाला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, वेन पार्नेल, मोहम्मद सिराज आणि विजयकुमार वैशाक.
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग 11 -
डेविड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, यश धुल, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हाकिम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नार्जे आणि मुस्तफिजुर रहमान.
मिचेल मार्शचे पुनरागमन -
RCB vs DC: दिल्ली कॅपिटल्सचा विस्फोटक फलंदाज मिचेल मार्श याने संघात पुनरागमन केलेय. आठवडाभरासाठी तो आयपीएलमधून सुट्टीवर गेला होता. तर आरसीबीचा वानिंदु हसारंगा संघात परतालया. हसरंगाच्या आगमनामुळे आरीबीची ताकद वाढली. त्याशिवाय विजयकुमार वैशाक याने आरसीबीसाठी पदार्पण केलेय.
RCB vs DC Head to Head : कुणाचं पारड जड?
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरुचं पारड जड दिसून आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 27 पैकी 16 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्स संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. एक सामना ड्रॉ झाला. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 190 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.