VIDEO : 'फाफ'ने मारला IPL 2023 चा सर्वात लांब षटकार; मॅक्सवेल झाला चकीत
IPL 2023 : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फंलदाजी करताना आरसीबीने निर्धारित 20 षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली.
IPL 2023 : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फंलदाजी करताना आरसीबीने निर्धारित 20 षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी दमदार अर्धशतके झळकावली. आरसीबीच्या या केजीएफ यांनी आज मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. फाफ डु प्लेसिस यांने आज कर्णधाराला साजेशी खेळी केली. विराट फलंदाजी करत असाताना फाफ डु प्लेसिस संयमी फलंदाजी करत होता. विराट फलंदाजी करताना फाफ डु प्लेसिस 21 चेंडूत 33 धावांवर खेळत होता. विराट बाद झाल्यानंतर फाफने आक्रमक रुप घेतले. त्याने पुढील 15 चेंडूत 46 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये गगनचुंबी षटकारांचा समावेश आहे. 15 व्या षटकात फाफ याने यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार मारला.. हा चेंडू थेट स्टेडिअमवर पडला.. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलने अधिकृत ट्वीटरवरही हा व्हिडीओ पोस्ट केलाय.
फाफ डु प्लेसिस याला विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जाते. डु प्लेसिस याने लखनौविरोधात 115 मीटरचा षटकार लगावला. हा षटकार पाहून दुसऱ्या बाजूला असणारा मॅक्सवेल चकीत झाला. तर तंबूत बसलेला विराट कोहली आश्चर्यचकीत झाला. मॅक्सवेल याची रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ
Absolute Carnage 🔥🔥@faf1307 deposits one out of the PARK 💥💥
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
We are in for an entertaining finish here folks!
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/ugHZEMWHeh
Glenn Maxwell's reaction on Faf Du Plessis' 115M six. pic.twitter.com/w4P0oJ3VAy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2023
फाफ डु प्लेसिसचे अर्धशतक -
विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी वादळी खेळी केली. विराट कोहलीनंतर फाफ डु प्लेसिस यानेही अर्धशतकी खेळी केली. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने अवघ्या 35 चेंडूत अर्धशतक झळकावले. विराट कोहली फलंदाजी करत असताना फाफ डु प्लेसिस दुसऱ्या बाजूला संयमी फलंदाजी करत होता. विराट कोहली बाद झाल्यानंतर फाफ डु प्लेसिस याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. फाफ डु प्लेसिस याने एक षटकार तर 115 मीटर लांब मारला. फाफचा षटकार पाहून मॅक्सवेलही आश्चर्यचकीत झाला होता. फाफ डु प्लेसिस याने 46 चेंडूत नाबाद 79 धावांची खेळी केली. या खेळीत फाफने पाच चौकार आणि पाच षटकार लगावले. फाफने विराट कोहलीसोबत 96 तर ग्लेन मॅक्सवेलसोबत शतकी भागिदारी केली.