(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : 50 सामन्यानंतर गुणतालिकेची स्थिती काय? प्ले ऑफ च्या स्पर्धेत कोण-कोण?
IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 मध्ये 50 सामन्यानंतर गुणतालिकेची स्थिती काय? प्ले ऑफ च्या स्पर्धेत कोण कोण?
IPL 2023 Play Off Teams : आयपीएल 2023 मध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सचे 11 सामन्यांत 13 गुण झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स आयपीएल गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स 10 सामन्यांत 14 गुणांसह पहिल्या क्रमाकांवर कायम आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) यंदाचा सोळावा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) ला 31 मार्चपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या टी20 लीगमधील 50 सामने खेळवण्यात आले आहेत. सर्व दहा संघांच्या एकूण 70 सामन्यांनंतर आयपीएल पॉईंट्स टेबलमधील टॉप-4 संघांमध्ये प्ले ऑफ सामने खेळवण्यात येतात. 50 सामन्यानंतर गुणतालिकेची स्थिती काय? प्ले ऑफ च्या स्पर्धेत कोणकोणते संघ आणि सध्याची समीकरण काय आहेत हे जाणून घ्या.
प्ले ऑफच्या स्पर्धेत कोणते संघ?
सध्या प्लेऑफच्या शर्यतीत गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) आघाडीवर आहेत. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाकडे सध्या 11 गुण आहेत. सध्या गुणतालिकेत टॉप-4 मध्ये गुजरात टायटन्स संघासह चेन्नई सुपर किंग्स (CSK), लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या संघांचा समावेश आहे.
IPL 2023 Points Table - SRH slips to No.10 now. pic.twitter.com/EctRELsJfw
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 6, 2023
मुंबई आणि बंगळुरु संघ कोणत्या स्थानावर?
इतर संघांची परिस्थिती पाहिली तर राजस्थान रॉयल्स (RR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. मात्र, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स संघाकडे 10-10 गुण आहेत.
इतर संघांची परिस्थिती काय?
कोलकाता नाईट रायडर्स आठव्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 10 सामने खेळले असून 4 सामने जिंकले आहेत. तर त्यांना 6 सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स नवव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचे 8 गुण आहेत. सनरायझर्स हैदराबाद सर्वात शेवटी दहाव्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाकडे दहा सामन्यांनंतर 6 गुण आहेत.