एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar : मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक

मित्र आणि राजकीय शत्रू म्हणून या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आहेत. फडणवीस मित्रत्व जपणार माणूस आहे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केलंय.

Vijay Wadettiwar: मित्र म्हणून तसेच राजकीय शत्रू म्हणून दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आहेत. राजकारणात ते काही गोष्टी सांगून करतात, तर काही गोष्टी न सांगता करतात. फडणवीस मित्रत्व जपणार माणूस आहे. मात्र आले अंगावर तर घेतले शिंगावर असा त्यांचा स्वभाव आहे. असे असले तरी मित्र म्हणून त्यांच्या नवीन इनिंगला माझ्या शुभेच्छा आहेत. असे म्हणत मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केलं आहे. सोबतच काही अपेक्षा देखील त्यांनी बोलतांना व्यक्त केल्या आहेत. ते नागपूर येथे बोलत होते.  

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होत आहे, यात आनंद आहे. त्यांनी बॅकलॉक भरून काढावा, त्यांना कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या देवेंद्र फडणवीसांवर अवलंबून आहेत. त्यांना कोणी थांबवु शकत नाही. विदर्भाच लेकरू म्हणून विविध क्षेत्रात विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवूया. मध्यंतरी त्यांचे नाव ते बदला घेण्याचं राजकारण करतात असा ठपका होता, तो आता पुसून निघेल अशी अपेक्षा आहे. विचारधारेची लढाई असावी, मात्र वैयक्तिक वैरी नसावं, जो समज झाला होता तो समज ही  पुसून निघेल, असे ही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. 

2029 मध्ये पवार- शिंदे यांची उपयुक्तता संपलेली असेल- विजय वडेट्टीवार 

स्वाभाविक मुख्यमंत्री राहिलेले शिंदे यांना सत्ता मिळून सत्तेची सर्वोच्च खुर्ची मिळत नसल्याने त्यांचा चेहरा पडून दिसला. 2029 मध्ये दोन्ही शिंदे पवार यांची उपयुक्तता संपली असावी, शिंदे-पवार यांना आता मोदी फडणवीस यांच्या आशिर्वादाने राहावे लागणार, काही दिल नाही तर चुपचाप राहावे लागेल. शिंदे उपमुख्यमंत्री पद नाही घेतलं तर दुसरा चेहरा आहे, त्यांची मजबुरी आहे. त्यांना पक्ष संभाळण्यासाठी त्यांना ही भूमिका घ्यावी लागेल. मुख्यमंत्री राहणाऱ्यांनी मंत्री पद घेतले, त्याशिवाय त्यांना पर्याय नाही. असेही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. 

मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक - संजय राऊत

काल एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. ज्यात एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसून आली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मावळता सूर्य आणि उगवता सूर्य यात फरक असतो.  उगवत्या सूर्याचे तेज असते, असा टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. 

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, अजित पवार कायम उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार काल गॉगल वगैरे लावून फिरत होते.  त्यांचा चेहरा लोकसभेनंतर उतरला होता. आता त्यांचे चेहरे फुलले आहेत. ईव्हीएमची त्यांनी पूजा केली पाहिजे. त्यांनी एक मंदिर ईव्हीएम आणि दुसरं मंदिर मोदी-शाह यांचे बांधावे, अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली. 

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Walmik Karad : वाल्मिक कराडची हजार कोटींचे मालक? ज्योती जाधवांची प्रॉपर्टी चर्चेतSpecial Story Sadhvi Harsha : कुंभमेळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधणारी साध्वी हर्षा कोण?Special Report on Sleeper Vande Bharat : पश्चिम रेल्वेवर धावणार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसSpecial Report on MCA : वानखेडेवर सुवर्णमहोत्सव, ग्राऊंडसमेनचा सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget