DC vs PBKS, Match Highlights: दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, पंजाबचा 31 धावांनी विजय
प्रभसिमरनच्या शतकी खेळीनंतर हरप्रीत ब्रार याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पंजाबने विजय मिळवला.
IPL 2023, DC vs PBKS: पंजाबच्या फिरकीच्या जाळ्यात दिल्लीचा संघ अडकला. चांगल्या सरुवातीनंतर दिल्ली विजयापासून दूर राहिली. १६८ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ निर्धारित २० षटकात १३६ धावांपर्यंत मजल मारली. पंजाबने दिल्लीचा ३१ धावांनी पराभव केला. डेविड वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय एखाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर या दोघांनी सहा विकेट घेतल्या. या पराभवासह दिल्लीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय.
डेविड वॉर्नर आणि फिल साल्ट यांच्या वादळी सुरुवातीनंतर दिल्लीची फलंदाजी ढेपाळली. डेविड वॉर्नर आणि साल्ट याने ६९ धावांची भागिदारी केली होती. ६९ धावांवर पहिली विकेट पडली. त्यानंतर दिल्लीची फलंदाजी ढेपाळली आहे. डेविड वॉर्नर याने २७ चेंडूवर ५४ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये डेविड वॉर्नर याने एक षटकार आणि दहा चौकार लगावलेत. तर साल्ट याने १७ चेंडूवर २१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन चौकार लगावलेत.
मिचेल मार्श, रायली रुसी, अक्षर पटेल, मनिष पांडे यांनी झटपट विकेट फेकल्या. मिचेल मार्श याला तीन धावा काढता आल्या. रायली रुसो पाच धावांवर बाद झालाय. अक्षर पटेल एक धावांवर बाद झालाय. मनिष पांडे याला खातेही उघडता आले नाही.
अमन खान १६ धावांवर बाद झाला.. १८ चेंडूत त्यांने १६ धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांनी नाबाद राहात दिल्लीचा दारुण पराभव टाळला. कुलदीप यादव १० धावांवर नाबाद राहिला... मुकेश कुमार सहा धावांवर नाबाद राहिला.
पंजाबच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. सुरुवातीला दिल्लीच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजाची धुलाई झाली. पण पावरप्लेनंतर पंजाबच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. पंजाबच्या गोलंदाजांनी पाच षटकात दिल्लीच्या सहा विकेट घेतल्या. हरप्रीत ब्रार याने चार षटकात ३० धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्यात. त्याशिवाय राहुल चहर याने चार षटकात १६ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय नॅथन एलिस यानेही दोन विकेट घेतल्या.
प्रभसिमरनची शतकी खेळी -
प्रभसिमरच्या शतकी खेळीच्या बळावर पंजाबने सात विकेटच्या मोबदल्यात 167 धावांपर्यंत मजल मारली. प्रभसिमरनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दल्लीकडून इशांत शर्माने दोन विकेट घेतल्या. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्सची सुरुवात खराब झाली. पावरप्लमध्ये पंजाबने तीन विकेट गमावल्या होत्या. सहा षटकात पंजाबने तीन विकेटच्या मोबद्लायत ४६ धावा केल्या होत्या. कर्णधार शिखर धवन सात धावा काढून तंबूत परतला. ईशांत शर्माने शिखर धवनला बाद केले. लियाम लिव्हिंगस्टोन यालाही मोठी खेळी करता आली नाही. लिव्हिंगस्टोन चार धावा काढून बाद झाला. त्याला इशांत शर्माने बाद केले. तर अक्षर पटेल याने फॉर्मात असलेल्या जितेश शर्माला बाद केले. जितेश शर्मा पाच धावा काढून बाद केले.
तीन विकेट झटपट गेल्यानंतर प्रभसिमरन याने सॅम करनच्या मदतीने पंजाबच्य डावाला आकार दिला. पण सॅम करन २० धावांवर बाद झाला. त्याने एक चौकार लगावला. हरप्रीत ब्रार दोन आणि शाहरुख खान दोन धावांवर बाद झाले. पंजाबचा डाव पुन्हा एकदा ढासळला. अखेरीस सिकंदर रजाने ११ धावा काढत पंजाबचा डाव १६७ पर्यंत पोहचवला. प्रभसिमरन याने एकाकी झुंज दिली. प्रभसिमरनचा याचा अपवाद वगळता एकाही फलंजाला तीस धावसंख्या ओलांडता आली नाही. प्रभमसिमन याने ६४ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. प्रभसिमरन याने ४४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर २० चेंडूत ५३ धावांचा पाऊस पाडला. प्रभसिमरन याने पंजाबच्या धावसंख्येतील सत्तर टक्के धावा एकट्याने काढल्या. दरम्यान, दिल्लीकडून इशांत शर्मा याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेल, प्रविण दुबे, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.