(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 Points Table : राजस्थानची घसरण, मुंबई-चेन्नईची झेप, पाहा गुणतालिकेत तुमचा संघ कोणत्या स्थानावर?
IPL 2023 Points Table : लखनौ, चेन्नई आणि मुंबईने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. तर राजस्थानच्या संघाची घसरण झाली आहे.
IPL 2023 Points Table : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात बुधवारी (3 मे) दोन सामने झालेत. या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. लखनौ, चेन्नई आणि मुंबईने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. तर राजस्थानच्या संघाची घसरण झाली आहे. मुंबईने पंजाबचा सहा विकेटने पराभव करत दोन गुणांची कमाई केली. तर लखनौच्या इकाना स्टेडिअमवर पावसाचा विजय झाला. त्यामुळे लखनौ आणि चेन्नई संघाला प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला आहे. त्यामुळे लखनौ आणि चेन्नई संघाने राजस्थानला मागे टाकलेय. तर मुंबईने पंजाबला मागे टाकत गुणतालिकेत झेप घेतली आहे.
आघाडीचे चार संघ कोणते?
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजरातने नऊ सामन्यात सहा विजय मिळवले आहेत. 12 गुणांसह ते पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत. गुजरातने आतापर्यंत फक्त तीन सामने गमावले आहेत. आज एका गुणाची कमाई करत लखनौच्या संघाने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. लखनौचे 10 सामन्यात 11 गुण झाले आहेत. चेन्नईचेही 10 सामन्यात 11 गुण आहेत. पण लखनौचा नेट रनरेट चेन्नईपेक्षा सरस असल्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेय. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघ चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 9 सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. तर चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
10 गुण असणारे चार संघ -
आयपीएलचा 16 वा हंगाम जसा जसा पुढे जाऊ लागला तसा तसा रोमांचक होत आहे. गुणतालिकेवर नजर मारल्यास 10 गुण असणारे चार संघ असतील. पण सरस रनरेटच्या आधारावर राजस्थानने चौथ्या स्थानावर कब्जा मिळवलाय. तर आरसीबी पाचव्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 9 सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. मुंबई इंडियन्सने सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुंबईने 9 सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. पंजाब किंग्स याचा आज झालेल्या पराभवामुळे सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. पंजाबचे 10 सामन्यात पाच विजयासह 10 गुण आहेत.
तळाला असणाऱ्या संघाची स्थिती काय ?
कोलकाता, हैदरबाद आणि दिल्ली हे संघ तळाशी आहेत. या तिन्ही संघाला आतापर्यंत फक्त तीन तीन सामने जिंकता आले आहेत. कोलकाता संघाने नऊ सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. कोलकाता आठव्या क्रमांकावर विराजमान आहे. तर हैदराबाद संघाने आठ सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. दिल्लीच्या संघाने नऊ सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी तिन्ही संघाला प्रत्येक सामन्यात विजय गरजेचा आहे.
IPL 2023 Points Table:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 3, 2023
- GT with 12 Points.
- CSK and LSG with 11 Points.
- RR, MI, RCB and PBKS with 10 Points.
- KKR, SRH and DC with 6 Points.
- What a competition! pic.twitter.com/BLnE5403g1