RR vs PBKS, 1 Innings Highlight : शिखर धवन-प्रभसिमरनची अर्धशतके, राजस्थानला विजयासाठी 198 धावांची गरज
IPL 2023, RR vs PBKS: शिखर धवन याने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली.
IPL 2023, RR vs PBKS: शिखर धवनची कर्णधारपदाला साजेशी खेळी आणि युवा प्रभसिमरन याची वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 197 धावांपर्यंत मजल मारली. शिखर धवन याने 86 तर प्रभसिमरन याने 56 धावांची खेळी केली. राजस्थानकडून जेसन होल्डर याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. राजस्थानला विजयासाठी 198 धावांची गरज आहे.
शिखरची कर्णधारपदाला साजेशी खेळी -
शिखर धवन याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. शिखर धवन याने ५६ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान धवन याने ९ चौकार आणि तीन षटकार लगावले. शिखर धवन याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. शिखर धवन याने सुरुवातीला एकेरी आणि दुहेरी धावसंख्यावर भर दिला. शिखर धवन याने सुरुवातीला तीस चेंडूत फक्त तीस धावांची खेळी केली. होती. पण जम बसल्यानंतर शिखर धवन याने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट कोहली आणि डेविड वॉर्नर यांच्यानंतर आयपीएलमध्ये अर्धशतकचे अर्धशतक पूर्ण करणारा शिखर धवन तिसरा खेळाडू ठरला.
युवा प्रभसिमरनचे वादळी अर्धशतक -
सलामी फलंदाज प्रभसिमरन याने राजस्थानविरोधात अर्धशथकी खेळी केली. त्याने अवघ्या ३४ चेंडूत ६० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने तीन षटकार आणि सात चौकार लगाले. प्रभसिमरन याने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
प्रभसिमरनचे वादळ अन् शिखरचा संयम -
नाणेफेक गमावल्यानंतर शिखर धवन आणि प्रभसिमरन यांनी पंजाबला दणक्यात सुरुवात करुन दिली. दोघांनी नऊ षटकात ९० धावांची सलामी दिली. या भागिदारीमध्ये शिखर धवन याने संयमी फलंदाजी केली. तर प्रभसिमरन याने धावांचा पाऊस पाडला. ९० धावांमध्ये प्रभसिमरन याचा ६० धावांचा वाटा होता. तर शिखर धवनचा फक्त २४ धावांचा वाटा राहिला. शिखऱ धवन याने एकेरी दुहेरी धावसंख्या घेत प्रभसिमरनला स्टाईक दिली.
शिखरचा फटका थेट राजपक्षे दुखापतग्रस्त-
शिखर धवन याने मारलेल्या फटक्यामुळे भानुका राजपक्षे दुखापतग्रस्त झाला. शिखर धवन याने समोर फटका मारला... त्यावेळी नॉनस्ट्राइकला असलेल्या भानुका राजपक्षे याला चेंडू लागला. यामुळे राजपक्षे दुखापतग्रस्त झाला. यामुळे त्याला फलंदाजीसोडून बाहेर जावे लागले. राजपक्षेची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत कोणताही माहिती मिळालेली नाही. पण राजपक्षे मधल्या षटकात पंजाबसाठी धावांचा पाऊस पाडत होता. गेल्या हंगमातही त्याने पंजाबसाठी खूप धावा जमवल्या होत्या. राजपक्षेची दुखापत गंभीर असल्यास हा पंजाबला मोठा धक्का मानला जाईल.
जितेश शर्मा - शिखरची दमदार भागिदारी -
शिखर धवन आणि जितेश शर्मा यांनी ६६ धावांची महत्वाची भागिदारी केली. जितेश शर्मा याने १६चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. तर या भागिदारीत शिखर धवन याने ३६ धावांचे योगदान दिले. जितेश शर्मा आणि शिखर धवन यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
चहल- केएम आसिफचे अर्धशतक, अश्विनचा भेदक मारा -
युजवेंद्र चहल आज महागडा ठरला. चहल याने चार षटकात तब्बल ५० धावा खर्च केल्या. केएम आसिफ यानेही खराब गोलंदाजी केली. आसिफने चार षटकात ५० पेक्षा जास्त धावा खर्च केल्या. त्याशिवाय ट्रेंट बोल्ट यानेही चार षटकात ३८ धावा खर्च केल्या. अश्विन याने अचूक टप्प्यावर मारा केला. अश्विन याने चार षटकात फक्त २५ धावा खऱ्च केल्या.