एक्स्प्लोर

आला रे आला जोफ्रा आर्चर आला, मुंबईने प्रॅक्टिसचा व्हिडीओ केला शेअर

Jofra Archer in IPL : रोहित शर्मापासून ते जोफ्रा आर्चरपर्यंत सर्वजण फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करत आहेत.

Jofra Archer in IPL : मुंबई इंडियन्सने आयपीएल 16 ची तयारी सुरु केली आहे. प्रत्येक खेळाडू नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहे. फलंदाज, गोलंदाज प्रॅक्टिस करत आहेत. रोहित शर्मापासून ते जोफ्रा आर्चरपर्यंत सर्वजण फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करत आहेत. जोफ्रा आर्चरनेही नेटमध्ये घाम गाळला... गोलंदाजीत नाही तर फलंदाजी करण्यासाठी.. होय जोफ्रा आर्चरचा फलंदाजी करताना व्हिडीओ मुंबईने पोस्ट केला आहे. यामध्ये जोफ्रा आर्चर फटकेबाजी करताना दिसत आहे. 

दोन एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आरसीबीसोबत यंदाच्या आयपीएलमधील आपला पहिला सामना खेळत आहे. त्याआधी सर्व संघाने एकत्र सराव केला. त्याशिवाय विदेशी खेळाडूंचे फोटोशूटही करण्यात आले आहे. सरावादरम्यान जोफ्रा आर्चर याने चौकार आणि षटकार लगावले. मुंबईने सोशल मीडियावर जोफ्राचा सराव करताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. Presenting to you, 𝐉𝐨𝐟𝐟 𝐭𝐡𝐞 धमाकेदार 𝐛𝐚𝐭𝐭𝐞𝐫 🔥🤩
 असे कॅप्शन देत मुंबईने जोफ्राचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जोफ्रा मुंबईच्या जर्सीमध्ये पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे. दुखापतीमुळे गेल्या हंगामात जोफ्रा मुंबईच्या जर्सीत खेळताना दिसला नव्हता. पण आता जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. 

पाहा मुंबई इंडियन्सने शेअर केलेला व्हिडीओ ..... 

दरम्यान, यंदा मुंबईचा संघ जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड यांच्याशिवाय मैदानात उतरणार आहे. दुखापतीमुळे बुमराह संघाबाहेर आहे तर कायरन पोलार्ड निवृत्त झाला आहे. पोलार्ड फलंदाजी कोच म्हणून मुंबईसोबत काम करत आहे. 

गतवर्षी मुंबईची खराब कामगिरी - 

आयपीएल 2022 मध्ये मुंबईने निराशाजनक कामगिरी केली होती. गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर होता. गेल्यावर्षी मुंबईला 14 सामन्यात फक्त चार विजय मिळवता आले होते तर दहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या हंगामातील कामगिरी विसरुन मुंबईचा संघ यंदा मैदानात उतरणार आहे. 

जोफ्रा आर्चरबद्दल बाऊचर काय म्हणाला ?
जोफ्रा आर्चरचे परत येणे अपेक्षितच होते आणि त्याला पुन्हा खेळताना पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे, असे रोहित म्हणाला.  एमआयच्या गोलंदाजीबाबत आणि जोफ्राबद्दल मार्क बाऊचर म्हणाला की,   “माझ्या मते आमच्या गोलंदाजीची टीम खूप रोमांचक काम करेल. मागच्या काही वर्षांत एमआयने ज्या पद्धतीने टीम निवडली आहे ते आपल्याकडे बॅक अप असावे अशा दृष्टीने आहे. आता तरूण खेळाडूंनी चांगला खेळ करण्याची वेळ आली आहे. आम्ही सगळे अनुभवी आहोत आणि संधी येईल तेव्हा ज्युनियर्सना खेळू देण्यासाठी आमच्याकडे भरपूर जागा आहे. आमची गोलंदाजीची टीम सर्वांसाठी सरप्राइज असेल. 

“जोफ्रा एका मोठ्या दुखापतीतून परततो आहे. तो मागील काही काळापासून खूप खेळतो आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सध्या तरी तो चांगल्या स्थितीत आहे असे मला वाटते. तो आता मैदानात उतरून खेळण्यासाठीही सज्ज आहे. ही गोष्ट आमच्यासाठीही चांगली आहे. तो आयपीएलची सुरूवात दणदणीत करेल अशी मला आशा वाटते.

आणखी वाचा :  

आरसीबीला डबल धक्का! मॅक्सवेल-हेजलवूडच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

IPL 2023 मध्ये रोहित शर्माला आराम दिला जाणार ? कोच मार्क बाऊचरने दिली हिंट

इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पडणार, यंदाच्या आयपीएलमध्ये नवे नियम, जाणून घ्या सविस्तर 

IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget