एक्स्प्लोर

MS Dhoni and Dwayne Bravo : महेंद्रसिंह धोनीने ब्राव्होला शिकवलं शिट्टी वाजवायला, आयपीएल प्रोमो शूटचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

CSK: चेन्नई सुपर किंग्जचे दोन महान खेळाडू महेंद्रसिंह धोनी आणि ड्वेन ब्राव्हो यांनी आयपीएलसाठी एक प्रोमो शूट केला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IPL 2023, CSK : आयपीएलचा (IPL) फिव्हर हळूहळू क्रिकेटरसिकांना चढू लागला आहे. आयपीएल सुरू होण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. अशा स्थितीत सर्व फ्रँचायझी आणि त्यांचे खेळाडू आयपीएलच्या प्रोमोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. त्याला मैदानात पाहण्यासाठी चाहते अगदी आतुर होत आहेत. समोर येणाऱ्या काही बातम्यांतून धोनीची ही शेवटची आयपीएल असेल असं समोर येत आहे. कारण पुन्हा एकदा होम आणि अवे अशा प्रकारे सामने खेळवण्यास सुरुवात झाली आहे आणि चेन्नईचे घरचे सामने एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवले जातील. धोनी होमग्राऊंडमधील सामन्यानंतर आयपीएलमधून निवृत्त होईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान सध्यातरी चेन्नई सुपर किंग्जचा हा कर्णधार स्टार खेळाडूसोबत आयपीएलच्या एका शानदार प्रोमोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. महेंद्रसिंग धोनीसोबत स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो प्रोमो करताना दिसत आहे. ड्वेन ब्राव्हो आता निवृत्त झाला आहे, परंतु तरीही तो अजूनही आयपीएलसोबत खासकरुन सीएसकेसोबत जोडलेला आहे. ब्राव्हो आता चेन्नई सुपर किंग्जचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.

धोनी आणि ब्राव्होचा व्हिडिओ व्हायरल

ब्राव्हो आणि धोनीने एकत्र एक जबरदस्त प्रोमो शूट केला आहे. या प्रोमो शूटचा एक व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. धोनी आपल्या दोन बोटांच्या मदतीने शिट्टी वाजवत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे, परंतु ब्राव्होला तसं करायला जमत नाही. त्यानंतर धोनी त्याला दोन बोटांच्या मदतीने शिट्टी वाजवायला शिकवत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आणि ब्राव्हो खूप मस्ती करताना दिसत आहेत. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा VIDEO-

चेन्नई सुपर किंग्जसाठी मागील वर्ष तसं चांगलं नव्हतं कारण संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर होता. चेन्नईच्या खाली फक्त मुंबई इंडियन्स संघ होता. चेन्नई संघाने गेल्या वर्षी रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते जेणेकरून धोनीनंतर जाडेजा संघाला पुढे नेऊ शकेल. मात्र, चेन्नईच्या सततच्या पराभवामुळे संघ व्यवस्थापनाने पुन्हा एकदा धोनीच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी टाकली आणि त्यानंतर या वर्षी धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget