(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI vs SRH IPL 2023 Live Score : हैदराबादने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; मुंबई इंडियन्स पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार
SRH vs MI IPL 2023 Live Score : हैदराबादने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; मुंबई इंडियन्स पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार
MI vs SRH IPL 2023 : आज आयपीएलमध्ये (IPL 2023) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात थोड्याच वेळाच सामना रंगणार आहे. दरम्यान, हैदराबाद (SRH) संघाने नाणेफेक जिंकून (SRH Won Toss) पहिल्यांदा गोलंदाजी (SRH Choose to Bowl) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स (MI) संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार आहे. हैदराबादच्या घरच्या मैदानावर म्हणजेच राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) हा सामना रंगणार आहे.
SRH vs MI IPL 2023 Match 25 : हैदराबाद आणि मुंबई आमने-सामने
मुंबई इंडियन्सने (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या दोन्ही संघांची यंदाच्या आयपीएलची सुरुवात एकसारखीच झाली आहे. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले दोन सामने गमावले आणि त्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला. मुंबई (MI) आणि (SRH) गुणतालिकेत आठव्या आणि नवव्या स्थानावर असलेले हे दोन्ही संघ दोन गुण मिळवून गुणतालिकेत उडी घेण्याचा प्रयत्न करतील. हैदराबादला पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून घरच्या मैदानावर आणि नंतर दुसऱ्या सामन्यात लखनौकडून पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर, हैदराबादने पंजाबविरुद्धया सामना जिंकला. तसेच कोलकाताचाही पराभव केला.
MI vs SRH Head to Head : मुंबई विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 19 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड जड दिसून आलं आहे. मुंबईने 19 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स प्लेइंग 11 :
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, नेहाल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरेनड्रॉफ
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग 11 :
मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, मार्को यान्सिन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन
IPL 2023, CSK vs RCB : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.