कोलकात्याच्या खेळाडूवर भडकला हार्दिक पांड्या, व्हिडीओ व्हायरल
Hardik Pandya Angry On Field: अटीतटीच्या लढतीत गुजरातने कोलकात्याचा पराभव केला.
Hardik Pandya Angry On Field: अटीतटीच्या लढतीत गुजरातने कोलकात्याचा पराभव केला. या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या कोलकाताच्या रहमनुल्लाह गुरबाज याच्यावर भडकल्याचे दिसले. गुजरातची गोलंदाजी सुरु असताना हा प्रसंग घडला. हार्दिक आणि गुरबाजमध्ये काहीतरी झाले.. त्यानंतर हार्दिक पांड्या चांगलाच भडकला. त्याने गुरबाजला बोटाने खुणावत एकप्रकारे काहीतर इशाराच केला.
गुजरातची गोलंदाजी असताना 13 व्या षटकात हा प्रसंग घडला. हार्दिक पांड्या गोलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवर रहमनुल्लाह गुरबाज याने षटकार लगवला. त्यांतर दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसतेय. हार्दिक आणि गुरबाज यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. षटकार लगावल्यानंतर रहमनुल्लाह गुरबाज याला काही तरी म्हणाला... त्यानंतर हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी गेला. पण त्याचवेळी हार्दिकने बोट दाखवत गुरबाजला काहीतरी म्हटले.. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गुरबाजसोबत हार्दिक पांड्या पंचालाही काहीतरी म्हणत होता, असे व्हिडीओत दिसतेय. दोघांमध्ये नेमकं काय झाले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण गुरबाज 2022 मध्ये गुजरात संघाचा सदस्य होता. यंदा तो कोलकात्याकडून खेळत आहे.
— CricDekho (@Hanji_CricDekho) April 29, 2023
पहिल्या स्थानावरील राजस्थानला गुजरातकडून धक्का
गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. शनिवारी कोलकाताविरोधातील सामना जिंकत गुजरातने सलग तिसऱ्या सामन्यात हॅटट्रिक केली. या विजयासह गुजरातने राजस्थानला झटका देत पहिलं स्थान काबीज केलं. गुजरात संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले असून त्यापैकी सहा सामन्यांत विजय मिळवला आहे. हार्दिक पांड्याचा संघ 12 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. राजस्थान रॉयल्सकडे 10 गुण आहेत. या संघाने 8 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाकडे प्रत्येकी 10-10 गुण आहेत.
गुजरातने कोलकात्याला हरवले -
IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने कोलकात्याचा सात विकेटने पराभव केला. इडन गार्डन्स मैदानावर कोलकात्याने दिलेले 180 धावांचे आव्हान गुजरातने 13 चेंडू आणि सात विकेट राखून पार केले. विजय शंकर याने वादळी अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय शुभमन गिल आणि डेविड मिलर यांनी निर्णायाक योगदान दिले. कोलक्याताकडून एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.