(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : आयपीएलमध्ये डबल धमाका! एकीकडे कोहली आणि रोहित यांच्यात चुरशीची लढत, तर दुसरीकडे हैदराबाद विरुद्ध राजस्थान
IPL Double Header, SRH vs RR and RCB vs MI : आज 2 एप्रिल रोजी (रविवारी) आयपीएल 2023 मध्ये डबल हेडर मॅच (IPL Double Header) म्हणजेच दोन सामने रंगणार आहेत.
IPL 2023, RR vs SRH and MI vs RCB : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 'धुव्वाधार संडे' ठरणार आहे. आज 2 एप्रिल रोजी (रविवारी) इंडियन प्रीमियर लीगमधील 2023 मध्ये दोन सामने रंगणार आहेत. पहिला डबल हेडर सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. तर दुसरी लढत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या दोन संघांमध्ये आहे.
SRH vs RR, IPL 2023 : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात रणसंग्राम
इंडियान प्रीमियर लीगमधील चौथा सामना आज रविवारी हैदराबाद आणि राजस्थान या दोन संघात पाहायला मिळणार आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचा पहिला सामना आज 2 एप्रिल रोजी (रविवारी) दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. हा सामना हैदराबादमधील जीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. हैदराबादचा मूळ कर्णधार एडन मार्करम हैदराबादच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारवर असेल. तसेच राजस्थानची धुरा संजू सॅमसन सांभाळेल.
हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11
मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, ग्लेन फिलिप्स, वासिगंटन सुंदर, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), उमरान मलिक, अकील हुसेन, आदिल रशीद.
राजस्थानची संभाव्य प्लेईंग 11
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.
MI vs RCB, IPL 2023 : मुंबई विरुद्ध बंगळुरु
आयपीएल 2023 मधील पाचवा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या दोन संघांमध्ये होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) विरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये सामना असल्यामुळे कोण जिंकत हे औत्सुक्याचं ठरणार आहे. आजचा सामना रोमांचक होणार असून या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. RCB आणि MI यांच्यातील सामना बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडिअमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.
बंगळुरूची संभाव्य प्लेईंग 11
डू प्लेसिस (कर्णधार), फिन ऍलन, विराट कोहली, महिपाल लोमरोर, माइक ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, करण शर्मा, रीस टोपली, मोहम्मद सिराज.
मुंबईची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, अर्शद खान, जेसन बेहनडॉर्फ.
लाईव्ह सामना कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' अॅपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.