SRH vs RR Match Preview : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात रणसंग्राम, कोण ठरणार वरचढ?
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals : सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी (रविवारी) रंगणार आहे.
IPL 2023, SRH vs RR Match Preview : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) रविवारी (2 एप्रिल) रोजी सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचा आयपीएल 2023 (IPL 2023) मधील पहिला सामना असून दोन्ही संघांचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयी सुरुवात करण्याच्या हेतूने मैदानावर उतरतील. राजस्थान संजू सॅमसनच्या तर हैदराबाद भूवनेश्वर कुमारच्या नेतृत्त्वात मैदानात उतरेल.
राजस्थानचा संघ संजू सॅमसन (Sanju Samson) आणि जोस बटलरवर (Jos Buttler) मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल, तर हैदराबादला केन विल्यमसनकडून (Kane Williamson) चमत्काराची अपेक्षा असेल. हैदराबाद संघाने गेल्या सीझनमध्ये चांगली कामगिरी केलेले रशीद खान आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या खेळाडूंना कायम ठेवलेलं नाही.
हैदराबादची जबाबदारी भुवनेश्ववर
हैदराबादचा मूळ कर्णधार पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. संघाचा कर्णधार एडन मार्करम हैदराबादच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारवर असेल.
सलामी सामन्यात एडन मार्करम खेळणार नाही
हैदराबादचा मूळ कर्णधार मार्करम दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा एक भाग आहे. मार्करम सध्या नेदरलँड क्रिकेट संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. अशा परिस्थितीत संघाचा कर्णधार भुवनेश्वर कुमार असेल. मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा ही जोडी सलामीसाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हैदराबादकडे मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक आणि भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर हे चांगले भारतीय खेळाडू आहेत. टी नटराजनही दुखापतीनंतर परतला असल्यामुळे डेथ-ओव्हरची समस्या सुटली पाहिजे.
राजस्थान संघाची परिस्थिती काय?
राजस्थान रॉयल्सकडे यशस्वी जैस्वाल (Yashaswi Jaiswal) आणि जोस बटलर (Jos Buttler) हे दोन उत्तम सलामीवीर आहेत. शिवाय देवदत्त पडिक्कलचाही (Devdutt Padikkal) संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सलामी जोडी कोणती ठरतेय हे पाहावं लागेल. मात्र, यशस्वी आणि बटलर सलामीसाठी उतरण्याची शक्यता जास्त आहे. देवदत्त तिसऱ्या क्रमांकावर तर संजू सॅमसन (Sanju Samson) चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो.
राजस्थान संघाकडे मधल्या फळीत शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer), जिमी नीशम (Jimmy Neesham) आणि रियान परागसारखे (Riyan Parag) खेळाडू आहेत. तसेच, आर. अश्विन (Ravichandran Ashwin) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्यामुळे राजस्थानची गोलंदाजी तगडी आहे. हे दोघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाजीसाठी ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्ण साथीला आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :