(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : पंतसाठी दिल्लीच्या संघाने केली खास गोष्ट, ऋषभचाही खास मेसेज
IPL 2023 : दुखापतीमुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलला मुकला आहे. पंतशिवाय दिल्लीचा संघ मैदानात उतरला आहे.
IPL 2023 : दुखापतीमुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलला मुकला आहे. पंतशिवाय दिल्लीचा संघ मैदानात उतरला आहे. दिल्लीची धुरा डेविड वॉर्नरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पंतची कमी दिल्लीच्या संघाला नक्कीच जाणवत असेल, यात शंका नाही. 2022 डिसेंबरमध्ये पंतचा भीषण अपघात झाला होता, त्यानंतर त्याच्यावर सर्जरी झाली आहे. पंत पुढील काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. पंत आयपीएलमध्ये खेळत नसला तरी त्याच्यासाठी दिल्लीच्या संघाने खास गोष्ट केली आहे. दिल्लीच्या संघाने पंतसाठी डगआऊटमध्ये जर्सी ठेवली आहे. त्याच्या नावाची जर्सीही डगआऊटमध्ये ठेवण्यात आली आहे. पंत सामन्यात नसला तरी तो संघासोबत आहे, असा संदेश दिल्लीच्या संघाला द्यायचा असेल.. पंतसाठी दिल्लीच्या संघाने केलेला हा आदर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
The Delhi Capitals dugout has Rishabh Pant's jersey above.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 1, 2023
Great gesture by DC! pic.twitter.com/ZQW5NdDCwC
A lovely picture - Rishabh Pant jersey in the dugout. pic.twitter.com/h1wnXgafsI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 1, 2023
पंतचा मेसेज -
सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने चाहत्यांसाठी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांना दिल्लीची प्लेईंग 11 कशी असेल.. याबाबत विचारण्यात आले होते. या ट्विटला रिप्लाय देताना पंत म्हणाला की, मी संघाचा 13 वेळा खेळाडू आहे. पंतने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, ‘ इम्पैक्ट नियमानुसार मी 13 वा खेळाडू आहे, नाहीतर 12 वा खेळाडू झाला असतो. ’
I am 13 th player coz of impact rule otherwise would have been 12 th man 😊😊😊❤️
— Rishabh Pant (@RishabhPant17) April 1, 2023
वॉर्नर काय म्हणाला -
दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्न म्हणाला की, ऋषभ पंत दुखापतीतून सावरत आहे. तो नसल्यामुळे मला संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतने आपल्या तबियतीची काळजी घ्यावी.. लवकरच लवकर दुखापतीवर मात करुन मैदानावर परत यावे.
What a picture - Rishabh Pant's jersey in Delhi Capitals' dugout.
— CricketMAN2 (@ImTanujSingh) April 1, 2023
Great gesture by Delhi Capitals. pic.twitter.com/Ik5QmcV6Bk
Jersey of Rishabh Pant in Delhi dugout!!
— 𝐆𝐥𝐞𝐧 (@SquareDrive_) April 1, 2023
Get well soon champ 💕 pic.twitter.com/FMJWoteFjL
Excellent gesture from Delhi Capitals to have Rishabh Pant's jersey at the dugout ❤️
— Vinesh Prabhu (@vlp1994) April 1, 2023
The 13th man of Delhi Capitals #IPL2023 pic.twitter.com/TPHa4V1iEE
दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राहुलचा लखनौ संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.
दिल्लीची प्लेइंग इलेवन
डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिशेल मार्श, रिले रोसौव, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन सकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार
दिल्लीने नाणेफेक जिंकली, लखनौ प्रथम फलंदाजी करणार, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11