(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्लीने नाणेफेक जिंकली, लखनौ प्रथम फलंदाजी करणार, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IPL 2022 : दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Lucknow Super Giants vs Delhi Capitals, IPL 2023 : दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राहुलचा लखनौ संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरत आहेत. दिल्लीच्या संघ नियमीत कर्णधार ऋषभ पंत याच्याशिवाय मैदानात उतरला आहे. दोन्ही संघात एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणार आहे. तर दिल्लीकडून मार्श गोलंदाजी करणार आहे.
लखनौची प्लेईंग 11 -
केएल राहुल (कर्णधार), कायल मेयर्स, मार्कस स्टोइनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, मार्क वुड, जयदेव उनादकट, रवी बिश्नोई, आवेश खान
दिल्लीची प्लेइंग इलेवन
डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिशेल मार्श, रिले रोसौव, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन सकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार
🚨 Toss Update from Lucknow 🚨@DelhiCapitals win the toss and elect to field first against @LucknowIPL.
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2023
Follow the match ▶️ https://t.co/086EqX92dA #TATAIPL#TATAIPL | #LSGvDC pic.twitter.com/dMsQFIKdXK
ऋषभ पंतची कमी जाणवणार का?
डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघ तुल्यबळ वाटतोय. वॉर्नर स्वत: विस्फोटक फलंदाजी करतो.. त्याशिवाय मिचेल मार्शही सध्या लयीत आहे. त्याशिवाय रिली रोसो, रोवमन पॉवेल आणि सरफराज खान यासारखे हार्ड हिटर दिल्लीच्या ताफ्यात आहेत. त्याशिवाय अक्षर पटेलसारखा तगडा अष्टपैलू खेळाडू संघाला अधिक संतुलीत करतो. गोलंदाजीत मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि चेतन सकारिया यांच्यासारखे भारतीय गोलंदाज आहेत. लखनौ विरोधात दिल्लीच्या संघाचे पारडे जड दिसतेय. दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमीत कर्णधार ऋषभ पंत यंदाच्या हंगामासाठी उपलब्ध नाही. त्याजागी डेविड वॉर्नरकडे दिल्लीची धुरा सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या जागी पश्चिम बंगालचा विकेटकीपर अभिषेक पोरेल याला सामील करण्यात आलेय. एनरिक नॉर्किया आणि लूंगी एनगिडी पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत... ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. लवकरच ते दिल्लीच्या संघासोबत जोडले जाणार आहेत. कागदावर दिल्लीचा संघ मजबूत दिसतोय.
राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघ उतरणार मैदानात -
2022 मध्ये लखनौ संघाने पहिल्यांदा आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. पहिल्याच आयपीएल हंगामात लखनौ संघाने सर्वांना प्रभावित केले. राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघाने प्लेऑफपर्यंत प्रवास केला होता. आता नव्या हंगामात नवी तयारीसह लखनौ संघ मैदानात उतरेल.. पण पहिल्या दोन सामन्यात दोन अनुभवी खेळाडूशिवाय लखनौ संघ मैदानात उतरणार आहे. राहुलसोबत सलामीची जबाबदारी पार पाडणारा क्विंटन डी कॉक आणि वेगवान गोलंदाज मोहसिन खान पहिल्या दोन सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. गेल्या हंगामात या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. क्विंटन डी कॉक सध्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. दक्षिण आफ्रिका संघाने त्याला अद्याप रिलिज केलेले नाही. तर मोहसिन खान अद्याप पूर्णपणे फिट नाही. अशात लोकेश राहुल याच्यासोबत सलामीला निकोलस पूरन उतरण्याची शक्यता आहे. मिनी ऑक्शनमध्ये निकोलस पूरन याला लखनौ संघाने 16 कोटी रुपयात खरेदी केले होते. लखनौ सुपर जायंट्स संघात तीन प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहेत. क्रृणाल पांड्याशिवाय मार्कस स्टॉयनिस आणि रोमारियो शेफर्ड यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. त्याशिवाय गोलंदाजीत आवेश खान याच्यासोबत मार्क वूड वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. तर फिरकी गोलंदाजीची धुरा रवी बिश्नोई याच्या खांद्यावर असेल. रवी बिश्नोई याने गेल्या हंगामात सर्वांनाच प्रभावित केले होते.