Ajinkya rahane : ओ मेरी आँखों का तारा है तू... अजिंक्यचे लेकीसोबतचे बॉडिंग, चेन्नईने पोस्ट केला फोटो
Ajinkya rahane : अजिंक्य रहाणे मैदानावर आणि मैदानाबाहेर शांत आणि संयमित वर्तनासाठी ओळखला जातो.
IPL 2023, Ajinkya rahane : मुंबईकर अजिंक्य रहाणे सध्या तुफान फॉर्मात आहे. संयमी अन् सावध फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणे यंदा बेभान होऊन फलंदाजी करत आहे. अजिंक्यसाठी क्रिकेट जितके महत्वाचे आहे... तितकेच कुटुंब महत्वाचे आहे. क्रिकेटमधील व्यस्त शेड्युलमधूनही तो कुटुंबासाठी वेळ देत असतो. अजिंक्यचे मुलीसोबत खास नाते आहे. कितीही व्यस्त असला तरी मुलीला वेळ देतोच. इतर बापाप्रमाणे अजिंक्यचे मुलीसोबत खास बाँडिंग आहे. अजिंक्य रहाणेचे मुलीसोबतचे फोटो चेन्नईने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अजिंक्य रहाणे याचे मुलीसोबतचे फोटो चेन्नईने ट्वीट केले आहेत. यामध्ये अजिंक्य रहाणे याचे मुलीसोबतचे बाँडिंग दिसत आहे. दोघांमधील ट्युनिंग दिसून येत आहे. या फोटोची सोशल मीडियात चर्चा सुरु आहे. नेटकरी कमेंट्स अन् लाईकचा वर्षाव करत आहेत. अजिंक्य रहाणे धोनीनंतर चेन्नईचे कर्णधारपद भूषवणार.. अशा कमेंट्सही यावर येत आहेत. अजिंक्य रहाणे आणि मुलीचे चार फोटोचे कोलाज चेन्नईने ट्वीटरवर पोस्ट केलेय. अजिंक्यने मुलीला उचलून घेतलेले दिसत आहे. एका फोटोत अजिंक्यची कॅप मुलीने हातात घेतली आहे. या फोटोतून बाप-लेकीचे बॉडिंग दिसून येतेय.
ओ मेरी आँखों का तारा है तू 💛#WhistlePodu #Yellove 🦁 @ajinkyarahane88 pic.twitter.com/RoNJ428tZh
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 8, 2023
अजिंक्य रहाणेने शाळेत भेटलेल्या राधिका धोपावकर या बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केले आहे. 2014 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले आणि त्यांना आर्या नावाची मुलगी आहे. अजिंक्य रहाणे मैदानावर आणि मैदानाबाहेर शांत आणि संयमित वर्तनासाठी ओळखला जातो.
View this post on Instagram
अजिंक्य रहाणेची विस्फोटक फलंदाजी
यंदा अजिंक्य रहाणे वेगळ्याच रुपात दिसलाय. अजिंक्य रहाणे जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडतोय. लिलावात खरेदीदारही मिळाला नव्हता... चेन्नईने अवघ्या 50 लाख रुपयात अजिंक्यला ताफ्यात घेतले अन् विश्वास दाखवला. यंदा अजिंक्य रहाणे याने आठ सामन्यात 245 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. अजिंक्य राहणे याने 12 षटकार आणि 19 चौकार लगावले आहेत. मैदानात उतरल्यानंतर अजिंक्य रहाणे याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.
आणखी वाचा :
WTC Final साठी राहुलच्या जागी ईशान किशनला संधी, BCCI ने केली घोषणा

















