IPL 2023: केन विलियमसनला तर रिलीज केलं, मग हैदराबादचा नवा कर्णधार कोण? आकाश चोप्रानं दाखवलं भारतीय खेळाडूकडं बोट
IPL 2023: आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व 10 फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादीत बीसीसीआयकडं सोपवली आहे.
IPL 2023: आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी (IPL Mini Auction ) सर्व 10 फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादीत बीसीसीआयकडं सोपवली आहे. या लीगमधील सर्व 10 फ्रँचायझींना त्यांचे खेळाडूंना रिटेन किंवा रिलीज करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांनी सर्वांना आश्चर्यचकीत केलं. दोन्ही फ्रँचायझीनं आपपल्या कर्णधारांनाच रिलीज केलंय. जगातील उत्कृष्ट कर्णधारांपैकी एक असलेल्या केन विल्यमसनला (Kane Williamson) संघातून रिलीज केल्यानंतर हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणत्या खेळाडूवर सोपवली जाणार? असा प्रश्न सर्वांसमोर पडलाय. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं (Aakash Chopra) आपलं मत मांडलंय.
आयपीएलच्या मिनी ऑक्शनपूर्वी हैदराबादच्या संघानं त्यांच्या 12 खेळाडूंना रिटेन केलंय. ज्यात कर्णधार केन विल्यमसनचाही समावेश आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारवर हैदराबादच्या संघाची धुरा सोपवली जाईल, अशी शक्यता आकाश चोप्रानं व्यक्त केलीय. तसेच आकाश चोप्रानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भुवनेश्वर कुमार हैदराबाद पुढचा कर्णधार असेल का? असा प्रश्न विचारलाय.
हैदराबादनं रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी
अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जेन्सन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि उमरान मलिक.
हैदराबादनं रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी
केन विलियमसन, निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन एबॉट, शशांक सिंह, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा आणि विष्णु विनोद.
सनरायजर्स हैदराबादकडं किती पैसै शिल्लक
सनराइजर्स हैदराबादने केन विल्यमसनसह एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळं आगामी आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनवेळी त्यांच्याकडं सर्वाधिक म्हणजेच 42.25 कोटी रुपये असणार आहेत.
ट्वीट-
#OrangeArmy, here are the #Risers who will continue to be a part of our journey for #IPL2023 🧡 #SunRisersHyderabad pic.twitter.com/B3ExEz8bP3
— SunRisers Hyderabad (@SunRisers) November 15, 2022
हे देखील वाचा-