GT vs RR, Toss Update : महामुकाबल्यात राजस्थानने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय, मोठी धावसंख्या करण्याचा निर्धार, पाहा दोघांची अंतिम 11
IPL 2022 : राजस्थान रॉयल्सने नुकतीच नाणेफेक जिंकली आहे. दरम्यान त्यांनी प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला असून अंतिम सामन्यासाठी राजस्थानने एकही बदल केलेला नाही. तर गुजरातने एक बदल केला आहे.
![GT vs RR, Toss Update : महामुकाबल्यात राजस्थानने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय, मोठी धावसंख्या करण्याचा निर्धार, पाहा दोघांची अंतिम 11 IPL 2022Final In GT vs RR match RR won toss and eleacted to Bat first GT vs RR, Toss Update : महामुकाबल्यात राजस्थानने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय, मोठी धावसंख्या करण्याचा निर्धार, पाहा दोघांची अंतिम 11](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/f9195dec22d7e267053f3a69e889aaca_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
RR vs GT, IPL 2022 Final : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवला जात आहे. सामन्यापूर्वी नुकतीच नाणेफेक झाली असून राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) नुकतीच नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या महासामन्यापूर्वी मैदानात सध्या क्लोजिंग सेरेमनी सुरु होता, ज्यानंतर आता लवकरच मॅचला सुरुवात होणार असून काही वेळातच मैदानात खेळाडू उतरणार आहेत.
दरम्यान संजूने प्रथम फलंदाजी करुन एक मोठी धावसंख्या गुजरातसमोर ठेवून त्यांच्यावर दबाव टाकण्याच्या निर्धारात आहे. याशिवाय आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघात एक महत्त्वाचा बदल केला आहे. अल्झारी जोसेफच्या जागी लॉकी फर्ग्यूसनला संधी दिली आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या संघाने नाणेफेक जिंकली असून त्यांनी मात्र एकही बदल संघात न करता खेळाडू मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...
पाहा दोन्ही संघाची अंतिम 11
गुजरात - शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, लॉकी फर्ग्यूसन, आर साई किशोर, मोहम्मद शमी, यश दयाल.
राजस्थान -जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेद मकॉय, युझवेंद्र चहल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)