IPL 2022: मुंबईच्या हातात आरसीबीचं प्लेऑफचं तिकीट, 'विजय मल्ल्या'चं 10 वर्षापूर्वाचं ट्वीट होतंय व्हायरल
IPL 2022: आजचा सामना मुंबईच्या संघासाठी औपचारिक असला तरी अखेरच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा रोहित सेनेचा प्रयत्न असेल.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील प्लेऑफची शर्यत रोमांचक वळणावर पोहचल्याची पाहायला मिळत आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आज मुंबईचा संघ दिल्लीशी भिडणार आहे. आजचा सामना मुंबईच्या संघासाठी औपचारिक असला तरी अखेरच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा रोहित सेनेचा प्रयत्न असेल. याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं भवितव्य आता मुंबई इंडियन्सच्या हातात आहे. दिल्लीविरुद्ध सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्लीचा पराभव केल्यास आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये धडक देईल. परंतु, या सामन्यात दिल्लीनं मुंबईला पराभूत केल्यास आरसीबीचा आयपीएल 2022 मधील प्रवास इथेच संपेल. याच पार्श्वभूमीवर विजय मल्ल्याचं दहा वर्षापूर्वीचं जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
विजय मल्ल्यानं दहा वर्षी केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलंय की, "माझ्या मते मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या ऑक्शमध्ये सर्वोत्तम खेळाडूवर बोली लावली आहे. त्यानं संघात महान खेळाडूंचा समावेश केला आहे." विजय मल्ल्याच्या या ट्विटवर प्रतिक्रियांचा वर्षाव होताना दिसत आहे.
विजय मल्ल्याचं ट्वीट-
बंगळुरूचा गुजरात टायटन्सवर आठ विकेट्सनं विजय
रॉयल चॅलेंजर्सचा माजी कर्णधार विराट कोहली (74) आणि तडाखेबाज फलंदाजी ग्लेन मॅक्सवेलच्या (40, नाबाद) वादळी खेळीच्या जोरावर बंगळुरूच्या संघानं गुजरातचा आठ विकेट्सनं पराभव केला. बंगळुरू आणि गुजरात यांच्यात गुरुवारी वानखेडेच्या मैदानावर सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत गुजरातच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीच्या संघानं आठ विकेट्स राखून गुजरातला पराभूत केलं. या सामन्यात विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांच्यात 115 धावांची भागेदारी झाली. या सामन्यात विराट कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
रिकी पॉन्टिंगचा दिल्लीच्या संघावर विश्वास
दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी शुक्रवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यात निर्णायक विजय मिळवण्यासाठी आपल्या संघावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. "मला खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे की, ते शनिवारी आणखी चांगली कामगिरी करतील. या हंगामात प्रथमच, आम्ही पाठोपाठ विजयांची नोंद केली. मी नेहमी स्पर्धेच्या शेवटी माझे सर्वोत्तम क्रिकेट खेळणं आणि योग्य वेळी शीर्षस्थानी पोहोचणं याबद्दल बोलतो. मला वाटते की खेळाडू फ्रँचायझीसाठी हे करणार आहेत, असंही रिकी पाँटिंग म्हणाला.
हे देखील वाचा-