MI vs DC Live Updates: मुंबईचा शेवट गोड, अखेरच्या सामन्यात दिल्लीला हरवले
MI vs DC Live Updates: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वात महत्त्वाचा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यात खेळला जाईल.
LIVE
Background
MI vs DC Live Updates: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वात महत्त्वाचा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यात खेळला जाईल. मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हा सामना रंगणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला आज मुंबईविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. दिल्लीनं हा सामना जिंकल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचं प्लेऑफमधील तिकीट कापलं जाईल.
कधी, कुठे पाहणार सामना?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2020 मधील 69 वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आज (21 मे) संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर इतर अनेक भारतीय भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकू शकता. यावेळी तामिळ, तेलगू, मल्याळम, मराठी आणि गुजराती या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवर सामन्यातील सर्व अपडेट्स पाहू शकता.
हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आतापर्यंत एकूण 31 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी दिल्लीनं 15 तर, मुंबईनं 16 सामने जिंकले आहेत. भारतात दोन्ही संघ 23 वेळा एकमेकांच्या विरोधात खेळले आहेत. त्यापैकी दिल्लीनं 11 तर, मुंबईनं 12 जिंकले आहेत. यूएईमध्ये दिल्ली आणि मुंबई यांच्यात 8 सामने खेळले गेले. ज्यात दोन्ही संघांनी 4-4 सामने जिंकले आहेत. मुंबईविरुद्ध दिल्लीची सरासरी धावसंख्या 146 आहे. तर, दिल्लीविरुद्ध मुंबईची सरासरी धावसंख्या 162 इतकी आहे. दिल्लीकडून ऋषभ पंतनं मुंबईविरुद्ध सर्वाधिक 333 धावा केल्या आहेत. तर, मुंबईकडून रोहित शर्मानं दिल्लीविरुद्ध सर्वाधिक 910 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
मुंबईचा शेवट गोड, अखेरच्या सामन्यात दिल्लीला हरवले
अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव करत शेवट गोड केला आहे. रोमांचक सामन्यात मुंबईने दिल्लीचा पाच गड्यांनी पराभव केलाय.
मुंबईचा अर्धा संघ तंबूत, तिलक वर्मा बाद
मोक्याच्या क्षणी तिलक वर्मा २१ धावांवर बाद झालाय.. मुंबईला पाचवा धक्का बसला.... मुंबईला विजयासाठी सात चेंडूत पाच धावांची गरज
मुंबईला चौथा धक्का, टीम डेविड बाद
शार्दुल ठाकूरने टीम डेविडला ३४ धावांवर बाद करत मुंबईला चौथा धक्का दिलाय.
टीम डेविडने सामना फिरवला
मुंबईच्या टीम डेविडने षटकारांचा पाऊस पाडत सामना मुंबईच्या बाजूने झुकवला
मुंबईला तिसरा धक्का, डेवॉल्ड ब्रेविस बाद
ईशान किशननंतर डेवॉल्ड ब्रेविसही बाद.. शार्दुल ठाकूरने ब्रेविसला 37 धावांवर बाद झालाय. मुंबई तीन बाद ८५ धावा