IPL 2022, RCB vs PBKS : प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी आज बंगळुरु-पंजाबमध्ये चुरशीची लढत; कधी, कुठे पाहाल सामना?
IPL 2022 : आज आयपीएलच्या मैदानात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स हे संघ मैदानात आमने-सामने येणार आहेत.
RCB vs PBKS : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (RCB vs PBKS) हे संघ एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार असून दोघांना पुढील फेरीत पोहोचण्यासाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण गुणतालिकेचा विचार करता बंगळुरुने आतापर्यंत 12 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह चौथं स्थान मिळवलं आहे. पण त्यांचा रनरेट काहीसा कमी आहे. दरम्यान आजचा विजय त्यांच्या खात्यात 16 गुण देईल आणि प्लेऑफच्या दिशेने त्यांचा एक यशस्वी पाऊल पडेल. दुसरीकडे पंजाब संघाने 11 पैकी 5 सामने जिंकल्याने ते गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत. त्याचं पुढील फेरीत पोहोचणं अवघड असलं तरी त्यांच्याकडे बंगळुरुपेक्षा अधिक सामने असल्याने त्यांची पुढील फेरीत पोहोचण्याची शक्यता जिवंत आहे. त्यामुळे दोन्ही संघाचं आव्हान एकमेकांसाठी अवघड ठरु शकते त्यामुळे आजचा सामना नक्कीच चुरशीचा होईल. आज होणाऱ्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (GT vs PBKS) या सामन्यात दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार यात शंका नाही. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी आहे सामना?
आज 13 मे रोजी होणारा रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (Royal challengers bangalore vs Punjab Kings) यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
हे देखील वाचा-
- IPL 2022: 'मुंबईत आलो तेव्हा माझ्याकडं कपडे नव्हते, टॉवेलवर दोन-तीन दिवस काढले' रोव्हमन पॉवेलनं ऐकवला तो किस्सा
- CSK Shivam Dube : चेन्नईत आल्यावर शिवम दुबे दमदार फॉर्ममागे येण्याचं कारण काय? सुनील गावस्कर म्हणाले...
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?