PBKS vs LSG, Match Live Updates : लखनौचा पंजाबवर 20 धावांनी विजय
PBKS vs LSG, IPL 2022 Live Score : आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालाली लखनौ टीम लयीत दिसत आहे. दुसरीकडे पंजाबने कसबसं स्वत:चं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.
LIVE
Background
PBKS vs LSG, IPL 2022 Live Score : आयपीएल 2022 मध्ये शुक्रवारी 42 वा सामना खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये पुण्याच्या एमसीए मैदानावर सामना रंगणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालाली लखनौ टीम लयीत दिसत आहे. दुसरीकडे पंजाबने कसबसं स्वत:चं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल...हे दोन मित्र शुक्रवारी आयपीएलच्या मैदानात एक दुसऱ्याविरोधात उभे राहणार आहेत.
पुण्याच्या एमसीए मैदानावर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कगिसो रबाडाच्या नेतृत्वात पंजाबची गोलंदाजी तगडी वाटतेय. पण राहुल-डिकॉकमुळे लखनौची फलंदाजी मजबूत दिसत आहे. त्याशिवाय स्टॉयनिस, बडोनी आणि हेटमायरसारखे पॉवरहिटर लखनौकडे आहेत. त्यामुळे सामना रोमांचक होणार यात शंका नाही.
लखनौविरोधात विजय मिळवण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला केएल राहुलची बॅट शांत ठेवावी लागणार आहे. लखनौविरोधात विजय मिळवण्यासाठी राहुलची बॅट शांत ठेवण्याचं ध्येय प्रतिस्पर्धी पंजाब संघाचं असणार आहे. राहुलच्या नेतृत्वातील लखनौच्या संघाने पाच विजय मिळवले आहेत. लखनौला तीन पराभवाला सामोरं जावे लागलेय. लखनौचा संघ 10 गुणांसह चौथ्या क्रमांकवर आहे. तर पंजाबचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. पंजाबच्या संघाने आठ सामन्यात चार विजय मिळवले आहेत. लखनौचा कर्णधार केएल राहुल सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. राहुलने मुंबईविरोधात यंदा दोन शतके झळकावली आहेत. राहुलच्या नावावर एक अर्धशतकही आहे. यंदाच्या हंगामात राहुल सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने यंदा दोन शतकासह 368 धावा चोपल्या आहेत. राजस्थानचा जोस बटलर राहुलच्या पुढे आहे.
पंजाबकडून चेन्नईचा पराभव
पंजाब किंग्स संघाने आपल्या मागील सामन्यात चेन्नईचा पराभव केला होता. शिखर धवनच्या नाबाद 88 धावा आणि गोलंदाजांनी अखेरच्या षटकात केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर पंजाबने विजय मिळवला होता. रोमांचक सामन्यात पंजाबने चेन्नईचा 11 धावांनी पराभव केला होता. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 187 धावा उभारल्या होत्या. त्यानंतर भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईला 176 धावांवर रोखलं होतं.
लखनौने मुंबईचा केला होता पराभव -
लखनौने आपल्या मागील सामन्यात राहुलच्या शतकाच्या बळावर मुंबई इंडियन्साचा पराभव केला होता. लखनौने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला. लखनौने प्रथम फंलदाजी करत 20 षटकात 168 धावा उभारल्या होत्या. राहुलने नाबाद 103 धावांची खेळी केली होती. 169 धावांचा पाठलाग करणारा मुंबईचा संघ 132 धावांपर्यंत मजल मारु शकला. मुंबईचा संघ प्लेऑफमधून बाहेर फेकला गेलाय. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी लखनौला प्रत्येक सामन्यात विजय गरजेचा आहे.
PBKS vs LSG, Match Live Updates : लखनौचा पंजाबवर 20 धावांनी विजय
PBKS vs LSG, Match Live Updates : लखनौने पंजाबचा 20 धावांनी पराभव केला. पंजाबचा संघ 133 धावांपर्यंत मजल मारु शकला.
PBKS vs LSG, Match Live Updates : पंजाबला आठवा धक्का, चाहर बाद
PBKS vs LSG, Match Live Updates : मोहसीन खान याने राहल चाहरला बाद करत लखनौला आठवे यश मिळवून दिले. चाहर चार धावांवर बाद झाला
PBKS vs LSG, Match Live Updates : पंजाबला सातवा धक्का, राबाडा बाद
PBKS vs LSG, Match Live Updates : मोहसीन खान याने रबाडाला बाद करत सातवा धक्का दिला आहे. पंजाब सात बाद 112 धावा... रबाडा दोन धावांवर बाद
PBKS vs LSG, Match Live Updates : पंजाबला मोठा धक्का, बेयस्टो बाद
PBKS vs LSG, Match Live Updates : लखनौने दिलेल्या धावांचा पाठलाग करणारा पंजाबचा संघ अडचणीत सापडलाय. बेयस्टोच्या रुपाने पंजाबला सहावा धक्का बसलाय
PBKS vs LSG, Match Live Updates : पंजाबचा अर्धा संघ तंबूत, जितेश शर्मा बाद
PBKS vs LSG, Match Live Updates :क्रृणाल पांड्याने पंजाबला पाचवा धक्का दिला..जितेश शर्मा दोन धावा काढून बाद