Suryakumar Yadav Ruled out: मुंबईला मोठा धक्का, सूर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर
Suryakumar Yadav Ruled out: यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाही. टायमल मिल्सनंतर आता सूर्यकुमार यादवही दुखापतीमुळे आयपीएमधून बाहेर गेलाय.
Suryakumar Yadav Ruled out: यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाही. टायमल मिल्सनंतर आता सूर्यकुमार यादवही दुखापतीमुळे आयपीएमधून बाहेर गेलाय. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटरवर याबाबतची माहिती मिळाली आहे. कोलकात्याविरोधात आज होणाऱ्या सामन्याआधी मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीला काही सामन्यांना सूर्यकुमार मुकला होता. आता दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवला आयपीएलला मुकावे लागलेय.
सूर्यकुमार यादवची कामगिरी
दरम्यान, गुजरातविरुद्ध गेल्या आठवड्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादवनं मुंबईसाठी आठ सामने खेळले आहेत. ज्यात 43.29 च्या सरासरीनं 303 धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवला दुखापतीमुळं आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सुरूवातीच्या तीन सामन्यांना मुकावं लागलं होतं.
आज कोलकात्याशी भिडणार मुंबईचा संघ
आज मुंबईचा संघ कोलकात्याशी त्यांचा बारावा सामना खेळणार आहे. यंदाच्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईच्या संघानं 11 सामने सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. तर, नऊ सामने गमावले आहेत. आजच्या सामन्यात मुंबईचा संघ सन्मान वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर, प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याचा संघ मुंबईशी भिडणार आहे. यासामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या रुपात मुंबईच्या चाहत्यांना निराश करणारी माहिती समोर आलीय.
टायमल्स मिल्सच्या रुपात मुंबईला पहिला धक्का
यापूर्वी मुंबईचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर पडला होता. त्याच्याऐवजी मुंबईच्या संघानं दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्स याला उर्वरित सामन्यासाठी करारबद्ध केलं. याची माहिती मुंबई इंडियन्सनं त्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून दिली होती.
हे देखील वाचा-