IPL 2022: दिनेश कार्तिकच्या बॅटिंगवर अजय जाडेजा खूश; तर विराटच्या 'फ्लॉप शो'वर म्हणाले...
Ajay Jadeja On Dinesh Karthik: आयपीएलचा पंधरावा हंगाम विराट कोहलीसाठी खूप खराब ठरला आहे. विराटनं यंदाच्या हंगामात 12 सामन्यांमध्ये 216 धावा केल्या आहेत.
Ajay Jadeja On Dinesh Karthik: आयपीएलचा पंधरावा हंगाम विराट कोहलीसाठी खूप खराब ठरला आहे. विराटनं यंदाच्या हंगामात 12 सामन्यांमध्ये 216 धावा केल्या आहेत. ज्यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे. रविवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला. ज्यामुळं अनेक दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या प्रदर्शनावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजानं विराट कोहलीच्या खराब फार्ममागचं कारण सांगितलं आहे. तसेच दिनेश कार्तिकच्या कामगिरीवरही त्यानं भाष्य केलं आहे.
अजय जाडेजा म्हणाले की, "फलंदाज म्हणून विराट कोहली आणि दिनेश कार्तिकची तुलना करता येणार नाही. कार्तिकनं यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली. फलंदाजीदरम्यान त्यानं उत्कृष्ट शॉट मारले आहेत. यंदाच्या हंगामातील सर्व सामन्यात दिनेश कार्तिक आत्मविश्वासानं खेळताना दिसलाय. त्यानं फलंदाजी करताना कधीही आऊट होण्याचा विचार केला नाही. अशा प्रकारे हा खेळ कोणत्याही खेळाडूपेक्षा मोठा असल्याचं सिद्ध झालं आहे, असं अजय जाडेजांनी म्हटलंय."
अजय जडेजा पुढे म्हणाले की, "दिनेश कार्तिकला थोडा उशीर झाला ही वेगळी बाब आहे. पण तो ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय, एक खेळाडू म्हणून त्याला दीर्घकाळ खेळायला आवडेल. कोहली ज्या टप्प्यातून जात आहे, ते कोणत्याही खेळाडूसाठी सोपं नसतं. कार्तिकला दीर्घकाळ क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. कार्तिक कठीण परिस्थितीत चांगलं खेळण्याचा अनुभव युवा खेळाडूंसोबत शेअर करू शकतो. कार्तिकचा सध्याचा फॉर्म पाहता तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असू शकतो, असं मानलं जात आहे."
हे देखील वाचा-