IPL 2022: चेन्नईच्या अडचणी वाढल्या! संघातील आक्रमक फलंदाज पुढील काही सामन्यांना मुकणार
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) संघाला काही खास कामगिरी करता आली नाही.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघानं सात सामने खेळले आहेत. त्यापैकी चेन्नईला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. तर, पाच सामने गमावले आहेत. यातच चेन्नईच्या संघाला मोठा धक्का देणारी माहिती देणारी समोर आली. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली (Moeen Ali) दुखापतीमुळं मुंबईविरुद्ध सामना खेळू शकला नव्हता. तो अजूनही दुखपतीतून सावरला नाही. ज्यामुळं चेन्नई पुढील काही सामन्यांना तो मुकणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोईन अली पुढील काही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी उपलब्ध नसणार. मोईन अलीला दुखापत झाली आहे. त्यामुळं तो आयपीएल 2022 च्या पुढील काही सामन्यांना मुकणार आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी हा मोठा झटका ठरू शकतो, कारण संघाला आतापर्यंत 7 सामन्यांत केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत.ट
ट्वीट-
आयपीएलच्या गेल्या हंगामात मैदान गाजवणाऱ्या मोईन अलीला यंदा काही खास कामगरी करता आली नाही. परंतु, अनेक सामन्यात मोईन अली सीएसकेसाठी सामना विजेता ठरला आहे. तो झंझावाती खेळीसाठी ओळखला जातो आणि चेंडूनं त्यानं चांगली कामगिरी बजावून दाखवली आहे. यामुळं येणाऱ्या सामन्यात त्याचं संघात नसणं चेन्नईसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : कधी आई-वडिलांना न सांगता खेळायला जायचा क्रिकेट; आता चेन्नई संघातून आयपीएल गाजवतोय
- Rohit Sharma Emotional Tweet: प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर रोहित शर्माचं भावूक ट्वीट, म्हणाला...
- IPL 2022: ईशान किशनची एक धाव 7.53 लाखांची! त्याच्यावर 15 कोटी खर्च करणं मुंबईच्या संघाला पडलं भारी
- PBKS vs CSK : चेन्नई आणि पंजाबच्या ‘किंग्स’मध्ये टक्कर, हेड टू हेड आकडे