Rohit Sharma Emotional Tweet: प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर रोहित शर्माचं भावूक ट्वीट, म्हणाला...
Rohit Sharma Emotional Tweet: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सनं (Mumbai) निराशाजनक कामगिरी करून दाखवली.
Rohit Sharma Emotional Tweet: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सनं (Mumbai) निराशाजनक कामगिरी करून दाखवली. या हंगामात मुंबईच्या संघाला एकही सामना जिंकता आला नाही. सलग आठ सामन्यात मुंबईच्या संघाला पराभव पत्कारावा लागला आहे. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) काल लखनौ आणि मुंबई (LSG Vs MI) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी मात दिली.या पराभवासह मुंबईचा संघ आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मुंबईच्या या निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मानं एक भावनिक ट्विट केलं आहे.
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या हंगामात पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबईला रविवारी रात्री लखनौ सुपर जायंट्सकडून आणखी एक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह मुंबई आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. मुंबईच्या या निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माने एक भावनिक ट्विट केले आहे.
रोहित शर्मा काय म्हणाला?
"आम्ही या स्पर्धेत आमचे सर्वोत्तम प्रदर्शन केले नाही, परंतु असं घडतं. अनेक दिग्गज खेळाडू या टप्प्यातून गेले आहेत. तसेच आमच्या हितचिंतकांचे आभार मानतो, ज्यांनी संघावर विश्वास आणि अतूट निष्ठा दाखवली."
मुंबईचा संघ पहिल्या विजयाच्या शोधात
लखनौविरुद्ध रविवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात मुबईचा संघ या हंगामातील विजयाचं खातं उघडेल. वानखेडेच्या मैदानावर पहिला सामना जिंकून पुनरागमन करेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, लखनौच्या संघानं दिलेल्या 169 लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ डगमगला. अखेर या सामन्यात मुंबईला 36 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
लखनौविरुद्ध मुंबईचा 36 धावांनी पराभव
या सामन्यात मुंबईच्या संघानं नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनौच्या संघानं कर्णधार केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 132 धावाचं करू शकला.
हे देखील वाचा-