PBKS vs CSK : चेन्नई आणि पंजाबच्या ‘किंग्स’मध्ये टक्कर, हेड टू हेड आकडे
IPL 2022, PBKS vs CSK : पंजाब किंग्स (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यामध्ये सोमवारी टक्कर होणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगमातील हा 38 वा सामना असणार आहे.
IPL 2022, PBKS vs CSK : पंजाब किंग्स (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यामध्ये सोमवारी टक्कर होणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगमातील हा 38 वा सामना असणार आहे. दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पंजाबने आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केली होती, मात्र कामगिरीत सातत्य राखता आले नाही. मयांक अग्रवालच्या नेतृत्वात पंजाब संघाने सात सामन्यात तीन विजय मिळवलेत तर चार पराभवाचा सामना केलाय. दुसरीकडे लागोपाठ पराभव मिळाल्यानंतर धोनीच्या फिनिशिंग टचमुळे चेन्नईची गाडी विजयाच्या पटरीवर परतली आहे. चेन्नईने सात सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. प्ले ऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघाला विजय आवशक आहे..
PBKS vs CSK हेड टू हेड -
आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये 26 सामने झाले आहेत. यामध्ये चेन्नईने 15 सामन्यात विजय मिळवला य. तर 11 सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे.
यंदाच्या हंगमात दोन्ही संघाची कामगिरी खराब झाली आहे. गुणतालिकेत पंजाबचा संघ आठव्या तर चेन्नईचा संघ नवव्य क्रमांकावर आहे. दोन्ही संघात एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा भरणार आहे. गोलंदाजीही धारधार आहे. त्यामुळे सामना रंगतदार होणार यात शंकाच नाही. कोणताही खेळाडू दमदार कामगिरी करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नाणेफेक महत्वाची –
चेन्नई आणि पंजाब यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर सामना होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नाणेफेक महत्वाची भूमिका बजावणार आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघ फायद्यात राहू शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
हे देखील वाचा-