KKR vs RR : हातावर आधी 50 लिहिलं, मैदानात उतरुन मॅचविनर ठरला, रिंकू सिंहच्या भविष्यवाणीचा Video
मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं राजस्थान रॉयल्सला सात विकेट्स राखून पराभूत केलं, यावेळी रिंकू सिंह सामन्याचा हिरो ठरला.
Rinku Singh Video : आयपीएल (IPL 2022) स्पर्धा म्हटलंकी चुरशीचे आणि अटीतटीचे सामने ठरलेले. कधी कोणता खेळाडू सामना फिरवेल सांगता येत नाही. यंदातर दिग्गज खेळाडूंच्या तुलनेत युवा खेळाडूच कमाल करत आहे. सोमवारी देखील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात देखील युवा खेळाडू रिंकू सिंहने कमाल केली. रिंकूने 23 चेंडूत नाबाद 42 धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. विशेष म्हणजे त्याने सामन्यापूर्वीच आज आपण अर्धशतक झळकावू असा विचार करुन 50 आकडा लिहित त्यांना बदामाचं चिन्ह हातावर रेखाटलं होतं. त्याने 50 धावा केल्या नसल्या तरी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरशा धावा त्याने केल्या. ज्यानंतर त्याने स्वत:साठी केलेल्या भविष्यवाणीचा व्हिडीओ केकेआरने पोस्ट केला आहे.
काय आहे व्हिडिओ?
सामन्यानंतर केकेआरने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर रिंकू आणि नितीश यांचा एक व्हिडीओ पोस्ट केलेला आहे. सामन्यात रिंकू आणि नितेश यांच्याच भागिदारीमुळे सामना केकेआरने जिंकला. यावेळी रिंकूने 23 चेंडूत नाबाद 42 तर नितीशने 37 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. त्यामुळे सामन्यानंतर या दोन्ही मॅच विनर्सनी एकमेकांशी गप्पा मारताना, नितीशने रिंकूचा हात पाहिला. यावेळी रिंकूने त्याच्या हातावर 50 आकडा लिहित त्यांना बदामाचं चिन्ह देखील रेखाटलं होतं. त्याबाबत नितीशने विचारणा केली असता, रिंकूने मला मी आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करेन असा विश्वास होता. त्यामुळेच मी असं लिहिलं होतं. तसंच मागील बऱ्याच 5 वर्षांपासून मी अशा संधीची वाट पाहत होतो, आज मिळाल्यानंतर मी कमाल करणार हे आधीच ठरवलं होतं.
केकेआरचा चौथा विजय
मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं राजस्थान रॉयल्सला सात विकेट्स राखून पराभूत केलं आहे.या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान, राजस्थानच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून 151 धावा केल्या होत्या. नितीश राणा आणि रिंकू सिंहनं संयमी खेळी करत कोलकात्याला 19.1 षटकात लक्ष्य गाठून दिलं. राजस्थानला पराभूत करून कोलकात्याच्या संघानं या हंगामातील चौथा विजय मिळवला आहे. या विजयासह कोलकात्याच्या संघाचं आठ गुण झाले आहेत.
हे देखील वाचा-
- KKR Vs RR: नितीश राणा, रिंकू सिंहची दमदार कामगिरी; कोलकात्याचा राजस्थानवर सात विकेट्सनं विजय
- IPL 2022 : आयपीएल 2022 चे 47 सामने आटोपले; 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित, वाचा संपूर्ण संघाचं गणित?
- IPL 2022: अखेरच्या षटकात सामना फिरवणाऱ्या ओबेड मॅकॉयचं भरमैदानात पुष्पा सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ