GT vs SRH, Match Live Updates : गुजरातचा हैदराबादवर पाच गड्यांनी विजय
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणारे गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन संघ मैदानात उतरणार आहेत.
LIVE
Background
GT vs SRH, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 40 वा सामना गुजरात टायटन्स संघ विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) या दोन संघात पार पडत आहे. दोन्ही संघाचा यंदाच्या हंगामातील (IPL 2022) फॉर्म दमदार असल्याने त्यांच्यातील आजचा सामनाही चुरशीचा होईल अशी आशा सर्वांनाच आहे. गुणतालिकेचा विचार करता गुजरातने 7 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन तिसरं स्थान मिळवलं आहे.
आजचा सामना होणाऱ्या मुंबईतील वानखेडे मैदानातील सीमारेषा पाहता मोठा स्कोर उभा राहण्याची शक्यता आहे. त्यात मागील काही सामन्यांपासून प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होताना दिसत आहे. पण आजचा सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण होऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी देखील घेऊ शकतो. नेमका निर्णय हा सायंकाळी नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.
गुजरात संभाव्य अंतिम 11
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद शमी
हैदराबाद संभाव्य अंतिम 11
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकिपर), शशांक सिंह, जगदीश सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, उम्रान मलिक, टी. नटराजन.
हे देखील वाचा-
GT vs SRH, Match Live Updates : गुजरातचा हैदराबादवर पाच गड्यांनी विजय
GT vs SRH, Match Live Updates :
राहुल तेवातिया आणि राशिद खान यांनी केलेल्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर गुजरातने हैदराबादचा पाच विकेटने पराभव केलाय.
GT vs SRH, Match Live Updates : उमरानचा पंच, गुजरातच्या अडचणी वाढल्या
GT vs SRH, Match Live Updates :
हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याच्या वेगवान माऱ्यापुढे गुजरातची फलंदाजी ढासळली आहे. मलिकने गुजरातच्या पाच फलंदाजांना बाद केलेय. गुजरात पाच बाद 140 धावा
GT vs SRH, Match Live Updates : उमरान मलिकचा भेदक मारा, गुजरातला दिले चार धक्के
GT vs SRH, Match Live Updates :
युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने भेदक मारा करत गुजरातच्या चार फलंदाजांना बाद केलेय. गुजरात चार बाद 139 धावा
GT vs SRH, Match Live Updates : गुजरातला तिसरा धक्का, साहा बाद
GT vs SRH, Match Live Updates :
वृद्धीमान साहाच्या रुपाने गुजरताला तिसरा धक्का बसला. उमरान मलिकने साहाला 68 धावांवर बाद केलेय
GT vs SRH, Match Live Updates : गुजरातला दोन धक्के, हार्दिक-गिल बाद
GT vs SRH, Match Live Updates :
196 धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादला दोन धक्के बसले आहेत. कर्णधार हार्दिक पांड्या 10 धावांवर बाद होतोय. गिल 22 माघारी परतलाय. 10 षटकानंतर गुजरात दोन बाद 90 धावा