Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Nitish Rana and Ayush Badoni : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यात क्वार्टर फायनल सुरु होती.
नवी दिल्ली : भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुरु आहे. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 11 डिसेंबरला क्वार्टर फायनलच्या मॅच सुरु होत्या. दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये दिल्ली आणि उत्तर प्रदेशचे संघ आमने सामने होते. याच मॅचमध्ये दिल्लीचा कॅप्टन आयुष बदोनी आणि उत्तर प्रदेशचा फलंदाज नितीश राणा यांच्यात वाद झाला.
नितीश राणा आणि आयुष बदोनी यांच्यातील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नितीश राणा याचा यापूर्वी देखील मैदानावर इतर खेळाडूंसोबत वाद झालेला आहे. 2023 च्या आयपीएलमध्ये नितीश राणा आणि ऋतिक शैकीन यांच्यात वाद झाला होता.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये नितीश राणा आणि आयुष बदोनी यांच्यात वाद झाला. या वादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाहायला मिळतं की नितीश राणा आयुष बदोनी फलंदाजी करत असताना गोलंदाजी करतो. त्यावेळी आयुष बदोनी एक रन घेण्यासाठी धावतो. तो जसा नॉन स्ट्राइकर एंडला पोहोचतो तेव्हा बदोनी आणि नितीश राणा यांच्यात वाद सुरु होता. दोघे एकमेकांजवळ पोहोचणार तितक्यात अम्पायरनं मध्यस्थी करत वाद मिटवला.
— Sunil Gavaskar (@gavaskar_theman) December 11, 2024
दिल्लीचा विजय
दिल्लीनं क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशला 19 धावांनी पराभूत केलं आहे. या मॅचध्ये उत्तर प्रदेशनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 3 बाद 193 धावा केल्या. दिल्लीकडून सर्वाधिक 44 धावा प्रियांश आर्यानं केल्या. त्यानं 3 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय यश ढुलनं 34 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारासह 42 धावा केल्या.
उत्तर प्रदेशच्या संघाला 20 ओव्हरमध्ये 174 धावा करता आल्या. उत्तर प्रदेशकडून प्रियम गर्ग यानं 34 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांसह 54 धावा केल्या.
इतर बातम्या :