IPL 2022 : बुमराहने टाकला सर्वोत्कृष्ट स्पेल, यांनी दिल्या प्रति षटक सहा पेक्षा कमी धावा..
IPL 15 Bowling Stats : आयपीएलचा पंधरावा हंगाम संपलाय... गुजरातने पदार्पणाच्या हंगामात विजेतेपदाला गवसणी घातली.
![IPL 2022 : बुमराहने टाकला सर्वोत्कृष्ट स्पेल, यांनी दिल्या प्रति षटक सहा पेक्षा कमी धावा.. ipl 2022 best bowling spell best economy under 6 most wickets most 5 wickets haul IPL 2022 : बुमराहने टाकला सर्वोत्कृष्ट स्पेल, यांनी दिल्या प्रति षटक सहा पेक्षा कमी धावा..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/28/449d0282b08ac6cd56d4e14c0cd98288_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 15 Bowling Stats : आयपीएलचा पंधरावा हंगाम संपलाय... गुजरातने पदार्पणाच्या हंगामात विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात गुजरातपुढे राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान होते. या सामन्यात राजस्थानने फलंदाजी करत 20 षटकांत 130 धावा केल्या. त्या धावांचा पाठलाग करत गुजरातने 18.1 षटकात 7 विकेट्स राखून सामना जिंकला. पदार्पणाच्या हंगामात गुजरातने राजस्थानचा पराभव करत आयपीएल चषकावर नाव कोरलेय. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपवर कब्जा केलाय.. पाहूयात यंदाच्या हंगामातील रोमांचक आकडेवारी...
यांनी एका डावात पाच विकेट घेतल्या
आयपीएल 2022 मध्ये एकूण 74 सामने खेळले गेले.. यामध्ये फक्त चार गोलंदाजांना एका डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम करता आला.. या यादीत तीन भारतीय गोलंदाजांची नावे आहेत. युजवेंद्र चहल, उमरान मलिक, वानिंदु हसारंगा आणि जसप्रीत बुमराह यांनी यंदाच्या हंगामात एका डावात पाच विकेट घेतल्यात... बुमराह आणि उमरान यांनी पाच विकेट घेतल्यानंतरही त्यांचा संघाचा पराभव झाला..
प्रति ओवर 6 पेक्षा कमी धावा देणारे गोलंदाज -
कोलकाता नाइट राइडर्सचा फिरकीपटू सुनील नारायन आणि लखनौ सुपर जायंट्सचा मोहसिन खान यांनी यंदाच्या हंगाात प्रति षटक सहापेक्षा कमी धावा दिल्यात. सुनील नारायनने 14 सामन्यात 9 विकेट घेतल्या.. यादरम्यान त्याने प्रति षटक 5.57 धावा दिल्या... मोहसीन खानने 9 सामन्यात 14 विकेट घेतल्या.. मोहसीनने प्रति षटक 5.97 धावा दिल्या..
बुमराहचा जबरदस्त स्पेल -
आयपीएल 2022 मध्ये अनेक गोलंदाजांनी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलेय. पण जसप्रीत बुमराह यात अव्वल आहे. बुमराहने 4 षटकात 10 धावा देत पाच विकेट घेतल्यात.. तर हसरंगाने 18 धावा देत पाच विकेट घेतल्या आहेत. तर उमरान मलिकने 25 धावा देत पाच विकेट घेतल्यात.
सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज -
युजवेंद्र चहल- 27 विकेट
वानिंदु हसारंगा- 26 विकेट
कगिसो रबाडा- 23 विकेट
उमरान मलिक- 22 विकेट
कुलदीप यादव- 21 विकेट
मोहम्मद शमी- 20 विकेट.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)