(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: लखनौ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अँडी फ्लॉवरची निवड
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 8 नव्हे तर 10 संघ खेळणार आहेत.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 8 नव्हे तर 10 संघ खेळणार आहेत. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आलीय. यावेळी लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची एन्ट्री झालीय. यातच झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरची (Andy Flower) लखनौ फ्रँचायझी संघाचे (Lucknow Team) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. फ्लॉवर गेल्या दोन मोसमात पंजाब संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.
फ्लॉवर यांनी येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “लखनौमधील नवीन फ्रँचायझीमध्ये सामील होताना मी खूप उत्साहित आहे आणि या संधीसाठी मी खूप आभारी आहे. 1993 मध्ये माझा पहिला भारत दौरा असल्याने, मला भारतात प्रवास करणे, खेळणे आणि प्रशिक्षण देणे नेहमीच आवडते. भारतातील क्रिकेटची आवड अतुलनीय आहे आणि आयपीएल फ्रँचायझीचे नेतृत्व करणे हा खरा विशेषाधिकार आहे आणि मी डॉ गोएंका आणि लखनौ संघासोबत काम करण्यास उत्सुक आहे", असंही फ्लॉवर यांनी म्हटलंय.
संजीव गोएन्का ग्रुपने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत लखनौ संघ जवळपास 7 हजार 90 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. “अँडीने एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून क्रिकेटच्या इतिहासावर अमिट छाप सोडली आहे. आम्ही त्याच्या व्यावसायिकतेचा आदर करतो आणि आशा करतो की तो आमच्या दृष्टीकोनातून काम करेल आणि आमच्या संघात मूल्य वाढवेल”, असा विश्वास गोयंका ग्रुपनं व्यक्त केलाय. गेल्या दोन हंगामात पंजाबचा कर्णधार असलेला केएल राहुल देखील संजीव गोएंका यांच्या मालकीच्या लखनौ फ्रँचायझीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Asian Champions Trophy 2021: पाकिस्तानचा धुव्वा उडवून भारताची उपांत्य फेरीत धडक; हरमनप्रीत-आकाशदीप ठरले विजयाचे हिरो
- PV Sindhu lost to Tai Tzu: पी. व्ही. सिंधूचे बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
- Novak Djokovic : यंदाचा ITF World Champion नोवाक जोकोविच; सातव्यांदा मिळवला बहुमान