Nashik BJP VS Shiv Sena Thackeray : आयारामांचं संकट? नाशिक भाजपात कटकट! Special Report
गिरीश महाजन...भाजपचा उत्तर महाराष्ट्रातला बडा चेहरा.. देेवेंद्र फडणवीसांच्या टीममधलं एक मोठं नाव...पण याच गिरीश महाजनांचा भाजप कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का?... त्यांना नाशकातल्या आमदारांच्या कर्तुत्वावर भरवसा नाही का? आपण स्वतःच्या जीवावर महापालिका निवडणुका जिंकू शकतो असा कॉन्फिडन्स त्यांना नाही का? हे प्रश्न आम्ही नव्हे तर भाजपचे तळागाळातले कार्यकर्ते विचारताहेत... आणि या प्रश्नांच्या सरबत्तीसाठी कारणीभूत ठरलाय नाशकात पार पडलेला पक्षप्रवेश सोहळा...या पक्षप्रवेशावरून कोणतं राजकीय रामायण घडलं... पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट
ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यानंतर बुधवारी नाशकात झालेला हा जल्लोष
हा जल्लोष करेपर्यंत दीनकर पाटील मनसेमध्ये होते आणि विनायक पांडे ठाकरेंच्या शिवसेनेत...
दोघांनी एकमेकांना पेढे भरवले..
मात्र हे पेढे पूर्णपणे जिरण्याआधीच दोघेही भाजपवासी झालेत..
दीनकर पाटील आणि विनायक पांडेंबरोबरच, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर यतीन वाघ यांनी यापुढे भाजपसाठी डरकाळी फोडण्याची शपथ घेतलीय...
नेते फोडताना भाजपच्या गिरीश महाजन यांनी सर्वपक्ष समभाव दाखवलेला दिसतोय...
त्यांनी काँग्रेसचे शाहू खैरे.. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भोसले यांना देखील गळाला लावलंय..
फडणवीसांच्या टीममधले संकटमोचक अशी गिरीश महाजन यांची ओळख...
मात्र या पक्षप्रवेशामुळे नाशकातल्या निष्ठावान आणि जुन्या भाजप नेत्यांना कार्यकर्त्यांना, आपल्यावर संकट ओढवल्याची जाणीव झालीय..
म्हणूनच पक्षप्रवेशासाठी निघालेल्या गिरीश महाजनांना नाशकातल्या भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घातला
All Shows

































