Municipal Corporation Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीतही घराणेशाहीचा दबदबा Special Report
एकवेळ समाजातून 'जात' जाईल पण राजकारणातली घराणेशाही काही केल्या जाणार नाही असं आपल्याकडील राजकारणाचं आत्ताचं चित्र आहे. नगरपालिका निवडणुकीत आपण घराणेशाहीची अनेक उदाहरणं पाहिलं
कुठे पुढाऱ्यांचे नातेवाईक निवडून आले
तर कुठे जनतेनं त्यांना नाकारलं,
नांदेडमध्ये एकाच घरात सहा तिकीट देण्याचा निर्णय भाजपच्या अंगलट आलेला आपण पाहिला.आता महानगरपालिका निवडणुकीतही सर्वपक्षीय घराणेशाहीचा दबदबा वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. पाहुयात हा रिपोर्ट
महापालिका निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी एकीकडे दुरावलेल्या घराण्यांचं मनोमिलन होतंय...
(ठाकरे बंधू आणि शरद पवार, अजित पवार काका-पुतणे)
तर दुसरीकडे निवडणुकीत घराणेशाहीचा दबदबा वाढण्याची शक्यता आहे...
नगरपरिषदांच्या निवडणुकीत जसा घराणेशाहीचा बोलबाला होता, तसंच चित्र आता महापालिकांमध्येही दिसू शकतं...
सर्वच पक्षांमध्ये आपल्या सगेसोयऱ्यांसाठी तिकिट मिळवण्यासाठी नेत्यांनी फिल्डिंग लावलीय...
सुरुवात करुयात ठाकरेंच्या शिवसेनेपासून...
ठाकरेंच्या शिवसेनेत नेत्यांकडून मुलगा,मुलगी,पत्नी,सुनेसाठी तिकीटांसाठी दबावतंत्र सुरु झालंय.
आमदार,खासदारांकडून घरच्यांना उमेदवारीची मागणी केली जात असल्याचं समोर आलंय.
आमदार सुनील प्रभू आपल्या मुलासाठी
खासदार संजय दिना पाटील आपल्या मुलीसाठी
माजी आमदार रमेश कोरगावकर आपल्या पत्नीसाठी
आमदार सचिन अहिर आपल्या मुलीसाठी
माजी महापौर श्रद्धा जाधव आपल्या मुलासाठी
माजी आमदार दगडू सपकाळही आपल्या मुलीसाठी
तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत...
विनोद घोसाळकर आपली सून पूजा घोसाळकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत
तर आमदार अजय चौधरींनाही आपल्या सुनेसाठी तिकीट हवंय...
All Shows

































