Kishor Jorgewar Vs Mungantiwar : जोरगेवार भी खुश, मुनगंटीवार भी खुश? Special Report
राजकारणात एकाची नाराजी दूर करायची म्हटलं की दुसऱ्याला नाराज करावं लागतं... मात्र पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भाजपनं, मुनगंटीवारांची नाराजी दूर करताना आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे थोडसं वेगळेपण दाखवलंय..मुनगंटीवारांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नाक आमदार किशोर जोरगेवार नाराज होत असल्याचं भाजपच्या लक्षात आलं..मग भाजपनं असा काही तोडगा काढला की मुनगंटीवार भी खूश आणि जोरगेवार भी खूश... कोणता आहे तो तोडगा...आणि त्यावरून चंद्रपूरचं राजकारण दिवसभर चर्चेत कसं राहिलं.. पाहुयात राजकीय शोलेचे हा स्पेशल रिपोर्ट
हे आहेत भाजपचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार.
बुधवारी रात्रीपर्यंत ते चंद्रपूरचे निवडणूक प्रमुख होते.
गुरुवारी सकाळी त्यांच्याकडून हे पद पक्षानं काढून घेतलं.
आणि
गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा ते निवडणूक प्रमुख झाले.
या सगळ्या झालेल्या आणि रद्द झालेल्या बदलांमागे होती भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांची नाराजी.
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका निकालांनंतर पुढचे तीन दिवस मुनगंटीवारांची नाराजी उफाळत होती.
त्यानंतर अचानक बुधवारपासून नाराजीची ही लाट ओसरली आणि मुनगंटीवारांनी पक्षाच्या कार्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली.
पण पक्षानं मुनगंटीवारांच्या नाराजीची दखल घेतल्याचे पडसाद दुसऱ्याच दिवशी चंद्रपूरमध्ये दिसले.
किशोर जोरगेवारांचं पद राज्यसभा खासदार अजय संचेतींकडं देण्यात आलं.
हा बदल जोरगेवारांसाठी धक्कादायक होताच.
मात्र त्याहून धक्कादायक होतं ते म्हणजे ही बातमी पक्षातून न समजता थेट माध्यमातून समजणं.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























