एक्स्प्लोर

Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 

Gold Rate : 2025 या वर्षात सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांना जोरदार नफा मिळाला आहे. 2026 मध्ये हाच ट्रेंड कायम राहील, का असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे.   

Gold Silver Outlook 2026 नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात 2025 मध्ये जोरदार वाढ झाली आहे. या वर्षात सुरु झालेली तेजी वर्षाच्या अखेरपर्यंत तेजी कायम आहे. सोने आणि चांदीच्या दरातील तेजीमुळं गुंतवणूकदारांना परतावा मिळाला आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार डिसेंबर 2024 मध्ये चांदीचे दर 85146 रुपये किलो होते.  आता चांदीचे दर सव्वा  दोन लाख रुपयांवर पोहोचले आहेत. 
   
एका वर्षात चांदीच्या दरात 144 टक्क्यांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर देखील  73 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळं सोने आणि चांदीतील गुंतवणुकीला गुंतवणूकदार प्राधान्य देत आहेत. 2026 मध्ये देखील सोने आणि चांदीच्या दरात तेजी कायम राहणार का प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे.  

सोने चांदी दराबाबत गुंतवणूक सल्लागारांना काय वाटतं?

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्सचे संचालक नवीन माथूर यांच्या मते 2026 मध्ये देखील सोने आणि चांदी दरातील तेजी कायम राहील. मात्र, वेग कमी असू शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला.  नवीन यांच्या मते कमी व्याज दर आणि जागतिक स्थिती पाहता सोन्याचे दर स्थिर राहू शकतात. औद्योगिक मागणी वाढल्यानं चांदी सोन्याच्या तुलनेत अधिक परतावा देऊ शकते. 

आयबीजेएचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांच्या अंदाजानुसार येत्या काळात सोनं  1.50 लाख ते  1.65 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतं. चांदीच्या दरात देखील तेजी पाहायला मिळू शकते. चांदीचे दर 2.30 लाख ते 2.50 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.  

सोने आणि चांदीच्या दरवाढीची कारणं 

जगभरातील केंद्रीय बँकांकडून सातत्यानं सोनं खरेदी केलं जात असल्यानं जागतिक स्तरावर सोन्याची मागणी वाढली आहे. दुसरीकडे औद्योगिक वापरासाठी कारखान्यांकडून चांदीची मागणी वाढल्यानं ते देखील दर वाढत आहेत.  

गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?

तज्ज्ञांच्या मते सोन्यात दीर्घ काळासाठी एसआयपी करणं चांगला पर्याय असू शकतो. सेनको गोल्डच्या सुवंकर सेन यांनी सोन्यामुळं स्थिरता मिळेल तर चांदीतील दरवाढीमुळं अधिक नफा कमावण्याची संधी आहे.  सिद्धार्थ जैन यांनी चांदीमध्ये देखील एसआयपी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते दरात वेगानं तेजी किंवा घसरण येऊ शकते, त्यामुळं एसआयपी चांगला पर्याय आहे.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Embed widget