(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020 : राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा मंदावल्या; पॉईंट टेबलची स्थिती काय?
गुरुवार रात्री झालेल्या सामन्यांमध्ये टॉस हरल्यानंतर राजस्थानला फलंदाजी करावी लागली. दरम्यान, स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या संघातील कोणताही फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही.
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या गुरुवारी रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने राजस्थान रॉयल्सचा आठ विकेट्सनी पराभव केला. 11 पैकी सात सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करणारा राजस्थानच्या संघासाठी प्लेऑफमध्ये पोहोचणं अत्यंत कठिण झालं आहे. कालच्या सामन्यानंतर पॉईंट टेबलमधील पहिल्या चार क्रमांकावर असणाऱ्या संघांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. परंतु, राजस्थानसाठी आता या सीझनमध्ये पुढील प्रवास अत्यंतखडतर असणार आहे.
गुरुवार रात्री झालेल्या सामन्यांमध्ये टॉस हरल्यानंतर राजस्थानला फलंदाजी करावी लागली. दरम्यान, स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या संघातील कोणताही फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्याचा परिणाम हा झाला की, संघातील 6 विकेट्स गमावत 154 धावा केल्या. राजस्थआनच्या वतीने सर्वात जास्त 36 धावा संजू सॅमसनने केल्या.
A look at the Points Table after Match 40 of #Dream11IPL pic.twitter.com/jyOUeMseB7
— IndianPremierLeague (@IPL) October 22, 2020
राजस्थानच्या 155 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या हैदराबादच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. हैदराबादचे स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टॉ लवकर आऊट झाले. परंतु, त्यानंतर मनीष पांडेने 83 आणि विजय शंकरने 52 नाबाद धावा करत संघाची जबाबदारी सांभाळली. संघाला विजय मिळवून दिला.
कालच्या सामन्यातील विजयामुळे हैदराबादच्या संघाने आता 10 पैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावरून थेट पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर राजस्थानचा संघ सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर राजस्थानला आता पुढिल सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवणं अत्यंत आवश्यक आहे.