IPL 2020 : दिल्लीविरूद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीचे संकेत, पुढील सामन्यात 'या' स्टार खेळाडूची संघात एन्ट्री होण्याची शक्यता
दिल्ली कॅपिटल्सची रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 59 धावांनी मात. कर्णधार विराट कोहलीची एकाकी झुंज अपयशी ठरली.
RCB vs DC : दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 59 धावांनी मात केली. दिल्लीने बंगलोरला 197 धावांचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगलोरचा संघ 137 धावांपर्यंतच मजल मारु शकली. कगिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं यंदाच्या मोसमात आपला चौथा विजय साजरा केला. कर्णधार विराट कोहलीची एकाकी झुंज अपयशी ठरली. या पराभवानंतर कर्णधार कोहली खूप निराश दिसत होता.
या मोठ्या पराभवानंतर बंगलोर कर्णधार विराट कोहली म्हणाला, “सामन्याच्या पहिल्या 6 षटकांत आम्ही चांगली सुरुवात केली, पण त्यानंतरच्या 8 षटकांत आम्हाला फलंदाजीत सातत्य राखता आलं नाही आणि आम्ही मागे जात गेलो. तर आमची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही चांगली होऊ शकत होती. आजची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही."
दिल्लीच्या 197 धावांचे लक्ष्य गाठताना आरसीबीचा कोणताही फलंदाज मोठी भागीदारी करू शकला नाही. यावर बोलताना कोहली म्हणतो, एवढ्या मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्हाला मोठ्या भागीदारीची आवश्यक होती. जर आपल्या हातात आठ विकेट असतील आणि शेवटच्या 10 षटकात तुम्हाला 100 पेक्षा जास्त धावा हव्या असतील तर आपल्याला भागीदारीची आवश्यकता असते. तर दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीचं विराट कोहलीने कौतुक केलं आहे.
IPL 2020, RCBvsDC: दिल्लीची बंगलोरवर 59 धावांनी मात, रबाडाची निर्णायक कामगिरी
दिल्ली कॅपिटल्सकडून मिळालेल्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने पुढच्या सामन्यात फलंदाजीत मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएल 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला मोठी किंमत देऊन खरेदी करण्यात आले होते. पण मॉरिस अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही. मॉरिसविषयी माहिती देताना कोहली म्हणाला की, ख्रिस मॉरिस दिल्ली विरुद्धच्या समन्यात खेळणार होता, पण शेवटी त्याला खेळता आले नाही. आमचा पुढील सामना चार दिवसानंतर आहे, त्यामुळे तो पुढचा सामना खेळू शकतो, असे स्पष्ट संकेत कोहलीने दिले आहे.
दरम्यान कालच्या सामन्यात दिल्लीनं बंगलोरला 197 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगलोरला 9 बाद 136 धावांचीच मजल मारता आली. रबाडानं 24 धावात 4 फलंदाजांना माघारी धाडलं. तर अक्षर पटेल आणि नॉर्तजेनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
त्याआधी दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकात चार बाद 196 धावा उभारल्या होत्या. दिल्लीच्या मार्कस स्टॉयनिसनं 26 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. तर पृथ्वी शॉनं 42 धावा फटकावल्या. याशिवाय शिखर धवननं 32 तर रिषभ पंतनंही 37 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं.