IPL 2020 | ...म्हणून आयपीएलमध्ये नंबर वन आहे बुमराह; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजाचा दावा
IPL 2020 : मुंबई इंडियन्समधील स्टार गोलंदाज मलिंगाने या सीझनमधून माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. अशातच संघाची जबाबदारी बुमराहच्या खांद्यावर आहे.
IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 12व्या सीझनमधील चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 19 सप्टेंबर रोजी आयपीएलच्या 13व्या सीझनचा पहिला सामना रंगणार आहे. अशातच मुंबई इंडियन्समधील स्टार गोलंदाज मलिंगाने या सीझनमधून माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. अशातच असं बोललं जात आहे की, मलिंगाने माघार घेतल्यामुळे संघाची जबाबदारी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे. परंतु, यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिनसनने भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज असल्याचं सांगितलं आहे.
मलिंगाने या सीझनमधून माघार घेतल्यानंतर संघात पॅटिनसनचा समावेश करण्यात आला आहे. पॅटिनसनचं म्हणणं आहे की, तो बुमराह आणि न्युझिलंडच्या ट्रेंट बाउल्टसोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे. मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅन्डलवर पॅटिनसनचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
📹 | Pattinson has joined the camp and is thrilled to partner with Boom and Boult! 💥⚡️#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL pic.twitter.com/2WAgKqi5Q7
— Mumbai Indians (@mipaltan) September 15, 2020
पॅटिनसन म्हणाला की, 'स्वतःचं मतं सांगायचं झालं तर जगभरातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांसोबत काम करणं अत्यंत उत्साहपूर्ण असणार आहे. अशातच बुमराह जगभरातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे. आणि बाउल्टही संघात आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. मी यूएईमध्ये काही आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे माझ्याकडे येथे खेळण्याचा अनुभव आहे.'
दरम्यान, पॅटिनसनला आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-20 सामने खेळण्याचा अनुभव अत्यंत कमी आहे. या स्टार वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत फक्त चार आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये केवळ 3 विकेट्स आपल्या नावे केले आहेत.
बुमराह डेप्थ ओवर्समधील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जात. बुमराह आतापर्यंत आयपीएलचे 77 सामने खेळला आहे. तर आतापर्यंत त्याने 82 विकेट्स घेतले आहेत. आयपीएलच्या 12व्या सीझनमध्ये 19 विकेट्स घेत बुमराह मुंबईतील सर्वोत्तम गोलंदाज बनला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
- धोनीच्या संघाला मोठा दिलासा; 'या' स्टार खेळाडूची संघात वापसी
- IPL संघांना मोठा धक्का, सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे खेळाडू
- IPL 2020 | आधी चेन्नई आता दिल्ली.... दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचा शिरकाव
- IPL 2020 | चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका खेळाडूसह 12 जण कोरोना पॉझिटिव्ह
- IPL 2020 MI Schedule: मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक
- IPL 2020 | सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नाही, वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला!