![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL संघांना मोठा धक्का, सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे खेळाडू
स्टीव स्मिथ, जोस बटलर, डेविड वॉर्नर, बेन स्टोक्स, मॅक्सवेल समेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे 17 ते 18 खेळाडू आयपीएल संघांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात.
![IPL संघांना मोठा धक्का, सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे खेळाडू IPL 2020 Australia England Cricketers to miss opening few matches of IPL season 13 UAE IPL संघांना मोठा धक्का, सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे खेळाडू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/08154017/Austreliya-ingland01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगचं 13वं सीझन यंदा दुबईमध्ये पार पडणार आहे. आयपीएल गवर्निंग काऊंसिलने बायो बबलमधून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळांडूंना कोणत्याही प्रकारची सूट देण्यास नकार दिला आहे. गवर्निंग काऊंसिलच्या या निर्णयाचा अर्थ असा की, या दोन्ही देशांचे खेळाडून आयपीएलच्या सुरुवातीच्या आठवड्यात सहभागी होऊ शकणार नाही.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सध्या लिमिटेड ओवर्सची सीरीज खेळवण्यात येत आहे. या सीरीजमधील अंतिम सामना 16 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. सीरीज संपल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी या दोन्ही देशांचे खेळाडू दुबईत पोहोचणार असून त्यांना 6 दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे. अशातच 24 सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू मैदानावर उतरण्याची शक्यता आहे.
आयपीएलमधील सर्वच संघांसाठी धक्का
क्वॉरंटाईन असताना या खेळाडूंची दोन ते तीन वेळा कोरोना चाचणी करण्यात येईल. खेळाडूंचा रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना आपापल्या संघासोबत घेण्याची संधी मिळणार आहे. गव्हर्निंग काऊंसिलच्या या निर्णयामुळे ज्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू खेळतात त्यांना एक किंवा दोन सामने या खेळाडूंविना खेळावे लागणार आहेत.
स्टीव स्मिथ, जोस बटलर, डेविड वॉर्नर, बेन स्टोक्स, मॅक्सवेल समेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे 17 ते 18 खेळाडू आयपीएल संघांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. एवढचं नाहीतर सुरुवातीच्या सामन्यांमध्ये वॉर्नर आणि स्मिथ जर खेळू शकले नाहीत, तर या संघांना नव्या कर्णधारांसोबत मैदानावर उतरावं लागेल. कारण या सीझनमध्ये हेच दोन्ही खेळाडू राजस्थान आणि हैदराबाद या संघांचं नेतृत्व करणार आहेत.
कोणत्या टिममध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे किती खेळाडू?
चेन्नई सुपर किंग्स : सॅम कुरेन, जोस हेजवुड दिल्ली कॅपिटल्स : एलेक्स कॅरी, स्टोइनिस कोलकाता नाइट राइडर्स : पॅट कमिंस, इयॉन मोर्गन किंग्स इलेवन पंजाब : क्रिस जोर्डन, मॅक्सवेल सनराइजर्स हैदराबाद : बेयरस्टो, डेविड वॉर्नर राजस्थान रॉयल्स : जोफ्रा आर्चर, स्मिथ, टॉम कुरेन, बेन स्टोक्य, एंड्रयू टॉय रॉयल चॅलेजंर्स बँगलोर : मोईन अली, एरॉन फिंच, एडम जांपा
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)