एक्स्प्लोर

IPL 2020 | सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नाही, वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला!

आयपीएल सुरुवात होण्याआधी चेन्नई सुपर किंग्ज संघाला आणखी एक धक्का बसला आहे. चेन्नईच्या संघात आधीच कोरोनाचा शिरकाव झाला आहे, त्यातच आता सुरेश रैनाही भारतात परतला आहे. तो यंदा आयपीएल खेळू शकणार नाही.

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू फलंदाज सुरेश रैना यंदाच्या आयपीएलला मुकणार आहे. सुरेश रैना संयुक्त अरब अमिरातमधून भारतात परतला आहे. वैयक्तिक कारणाने तो मायदेशी परत आला आहे. चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.

"वैयक्तिक कारणांमुळे सुरेश रैना भारतात परतला आहे. आयपीएलच्या या मोसमात तो खेळू शकणार नाही. चेन्नई सुपर किंग्ज अशा काळात सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे," असं ट्वीट चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं.

IPL 2020 | चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका खेळाडूसह 12 जण कोरोना पॉझिटिव्ह

33 वर्षीय सुरेश रैनाने 15 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. यानंतर आयपीएलच्या सराव शिबिरातही सुरेश रैना सामील झाला होता. संघासोबत तो दुबईला रवाना होता, तिथे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मुक्काम 'ताज' हॉटेलमध्ये आहे.

चेन्नई सुपर किंग्जसाठी हा मोठा धक्का समजला जोता. एक दिवसआधीच वृत्त समोर आलं होतं की, संघाच्या स्टाफमधील अनेक जणांना कोरोनाची लागण झाली होती. तसंच एक गोलंदाजही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. हा गोलंदाज दीपक चहर असल्याचं म्हटलं जात आहे.

आयपीएलच्या तेरावा मोसमाची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. स्टाफला कोरोनाची लागण झाल्याने चेन्नईचा संघाच्या खेळाडूंचा क्वारन्टाईन कालावधी एक आठवड्याने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे संघ 1 सप्टेंबरपासून सरावाला सुरुवात करु शकणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Bollywood Actress : हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai School Update : मुंबईतील सकाळच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीरRatnagiri Rain Jagbudi River : जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वरMumbai Air Way : दृष्यमानता कमी झाल्यामुळे हवाई वाहतुकीवरही परिणामABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स  8 AM 08 July 2024 Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Bollywood Actress : हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Horoscope Today 08 July 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Embed widget