IPL 2020 | धोनीच्या संघाला मोठा दिलासा; 'या' स्टार खेळाडूची संघात वापसी
दुबईत पोहोचल्यानंतर काही दिवसांनी चेन्नई सुपर किंग्सला त्यावेळी मोठा झटका लागला होता. ज्यावेळी दोन्ही खेळाडू दीपक चहर आणि ऋतुराद गायकवाड सह इतर 13 क्रूमेंबर्सचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
मुंबई : 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्ससोबत होणाऱ्या आयपीएलच्या 13 व्या सीझनच्या ओपनिंग सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्सला दिलासा मिळाला आहे. संघाचा स्टार गोलंदाज दीपक चहरची तिसरा कोरोनाचा अहवाल नेगेटिव्ह आला आहे. दीपक चहरने बुधवारी संघासोबत प्रॅक्टिसही सुरु केली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या वतीने यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या ऑफिशिअल ट्वीटर हँडलवरून चहरचे मैदानावर प्रॅक्टिस करतानाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. सीएसकेशी निगडीत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघातील ज्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्या दोन्ही खेळाडूंचे कोरोना चाचणीचे अहवाल नेगेटिव्ह आले आहेत.
दुबईत पोहोचल्यानंतर काही दिवसांनी चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका लागला होता. ज्यावेळी दोन्ही खेळाडू दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड सह इतर 13 क्रूमेंबर्सचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संपूर्ण संघाचा क्वॉरंटाईन कालावधी 4 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला होता. दरम्यान, दोन कोरोना चाचणी नेगेटिव्ह आल्यानंतर सर्व खेळाडूंनी 5 सप्टेंबरपासून आपली प्रॅक्टिस सुरु केली आहे.
Deeback Chahar! ????????#WhistlePodu #Yellove pic.twitter.com/muWNCiB2KF
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 9, 2020
याव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स संघाच्या समस्या तेव्हा वाढल्या जेव्हा आधी सुरेश रैना आणि हरभजन सिंह या दोन स्टार खेळाडूंनी 13व्या सीझनमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुटुंबासोबत भारतात परतला. तर हरभजन सिंहने वैयक्तिक कारणामुळे सीझनमधून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्सने हरभजन सिंह आणि सुरेश रैनाच्या रिप्लेसमेंटची डिमांड केलेली नाही. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, सुरेश रैना कदाचित संघात वापसी करू शकतो. यासर्व चर्चांनी सुरेश रैनाच्या वक्तव्यामुळे आणखी जोर धरला आहे. सुरेश रैना म्हणाला की, 'कोणाला माहिती, कदाचित मी याच सीझनमध्ये पुन्हा सीएसकेच्या जर्सीत दिसून येईल.'
इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. सीएसके तीन वेळा आयपीएल चॅम्पियनचा किताब पटकावला आहे. तसेच गेल्यावर्षीही फायनलमध्ये सीएसकेने आपली दमदार कामगिरी दाखवली होती. परंतु, विजेतेपद मुंबई इंडियन्सच्या पारड्यात पडलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या :
- IPL संघांना मोठा धक्का, सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे खेळाडू
- IPL 2020 | आधी चेन्नई आता दिल्ली.... दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचा शिरकाव
- IPL 2020 | चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका खेळाडूसह 12 जण कोरोना पॉझिटिव्ह
- IPL 2020 MI Schedule: मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक
- IPL 2020 | सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नाही, वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला!