एक्स्प्लोर
Advertisement
IPL 2020 | चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका खेळाडूसह 12 जण कोरोना पॉझिटिव्ह
चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका खेळाडूसह 12 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. IPL साठी हा मोठा धक्का आहे.
नवी दिल्ली : युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील 12 जण कोरोना विषाणूने संक्रमित झाले आहेत. कोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला मोठा धक्का बसलाय.
राजस्थान, पंजाब या संघांनी आपला क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत दाखल झाल्या-झाल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची करोचा चाचणी करण्यात आली होती. मात्र संघातील सपोर्ट स्टाफमधले १२ सदस्य आणि एका खेळाडूला करोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला आहे.
दुबईत 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली होती. आयपीएलचे 8 संघ खेळाडू आणि इतर स्टाफ मिळून 1 हजारापेक्षा जास्त लोकं भारतातून युएईत आली आहेत.Just in: Sources say members of @ChennaiIPL support staff and 1 player test positive. CSK extends quarantine till August end. All payers to undergo 4th Covid test.
— G. S. Vivek (@GSV1980) August 28, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement