RCB vs SRH, Pitch Report : बंगळुरु विरुद्ध हैदराबाद सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
आयपीएलमध्ये(IPL 2022) आज दुसरा सामना बंगळुरु विरुद्ध हैदराबाद असा असणार असून मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात हा सामना असणणार आहे.
RCB vs SRH, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज ऱॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद (RCB vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून दोन्ही संघाना पुढील फेरीत एन्ट्रीसाठी आजचा विजय महत्त्वाची भूमिका निभावेल. यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरु तिसऱ्या स्थानावर असल्यामुळे त्यांची पुढील फेरीत एन्ट्रीची शक्यता अधिक असली तरी हैदराबादचं आव्हानही अजून जिवंत आहे. त्यामुळे आजचा सामना नक्कीच चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे.
आजवरच्या इतिहासाचा विचार करता रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ तब्बल 20 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता हैदराबादचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरुने 8 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. पण यंदा बंगळुरुचा फॉर्म अधिक चांगला आहे. त्यामुळे दोघांती आजचा सामना चुरशीचा होऊ शकतो हे नक्की.
बंगळुरु विरुद्ध हैदराबाद अशी असेल ड्रीम 11 (RCB vs SRH Best Dream 11)
विकेटकीपर- दिनेश कार्तिक, निकोलस पूरन
फलंदाज- फाफ डु प्लेसीस, विराट कोहली,
ऑलराउंडर- ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा
गोलंदाज- भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, हर्षल पटेल, जोश हेझलवुड.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार होता. बंगळुरुने यंदा अप्रतिम कामगिरी करत तिसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ देखील चांगली कामगिरी करत असल्याने त्यांच आव्हान बंगळुरुसाठी अडचणीचं ठरु शकतं. आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.
हे देखील वाचा-
- DC vs RR, Top 10 Key Points : राजस्थानचा दिल्लीवर विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- IPL Full Match Highlights: राजस्थानचा धावांचा डोंगर सर करण्यात दिल्ली अपयशी, 15 धावांनी पराभव
- Asian Wrestling Championships : आशियाई कुस्ती स्पर्धेत अंशू मलिक आणि राधिकाला रौप्यपदक, मनीषाला कांस्य