एक्स्प्लोर
Rohit Pawar EXCLUSIVE : स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? रोहित पवारांचे मोठे वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे विधान केले आहे. 'आमची नाराजी अजित पवारांवर असली तरी खरा राग भाजपवर आहे, कारण भाजपने आमचे पक्ष आणि कुटुंब तोडले आहे,' असे स्पष्ट मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते, स्थानिक पातळीवर नाराजी दूर केली जाऊ शकते, पण भाजपवरील राग दूर होणार नाही. या विधानामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट भाजपविरोधात एकत्र येऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आले आहे. पवार यांनी हेही नमूद केले की, स्थानिक स्तरावर युतीबाबतचा अंतिम निर्णय जिल्हा पातळीवरील नेते घेतील आणि वरिष्ठ नेते त्याला मंजुरी देतील. शिंदे गट आणि अजित पवार गटातही कोकणात वाद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे कशी बदलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















