फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
फलटण प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याची खाते अंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Phaltan Doctor Sucide Case: फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही पडले. आत्महत्यापूर्वी डॉक्टर तरुणीने स्वतःच्या हातावर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (Gopal Badane) याने चार वेळा अत्याचार केल्याचं लिहित आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते व पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी गोपाळ बदने याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिलाय. कलम 311 (2) अंतर्गत निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेची शासकीय सेवा बडतर्फ करण्यात आली आहे. (Phaltan Doctor Case)
दरम्यान, फलटण प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याची खाते अंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी 72 तासामध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे रिपोर्ट सादर केला आहे.
Gopal Badne: आरोपी गोपाळ बदनेच्या बडतर्फीचा आदेश
फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला आता पोलीस दलातूनच तर्फ करण्यात आल्याचा आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी दिला आहे. निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने पदावर असताना बेफिकिरी, नैतिक अधःपतन, दुवर्तन व विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग करत समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केल्याचं या आदेशात म्हटलं आहे . पोलीस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरेल असे कृत्य करून कर्तव्य पालनात व दैनंदिन जीवनात संशयास्पद वर्तन केले हे घृणास्पद आणि निंदनीय आहे .त्यामुळे गोपाळ बाळासाहेब बदने या शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यार्थ ठेवणे हे सार्वजनिक व लोकहिताच्या दृष्टिकोनातून उचित होणार नाही .म्हणून निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यास शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश देण्यात आलाय . या देशाची अंमलबजावणी चार नोव्हेंबर पासून झाली आहे .

दरम्यान, फलटण प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याची खाते अंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी 72 तासामध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे रिपोर्ट सादर केला आहे.
गोपाल बदने पोलीस खात्यात आल्यापासून तक्रारी
पोलीस खात्यात आल्यापासून अनेक तक्रारी अर्ज त्याच्यावर होते, अनेक भागांमध्ये या गोपाल बदनेच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती, सर्वसामान्यांसोबत त्याचबरोबर अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन करत होता.. त्याचबरोबर फलटण मधील डॉक्टर महिला आत्महत्यामुळे समाजामध्ये पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली.. पोलिसांवर समाजामध्ये अविश्वास निर्माण झाला.. पोलिसांच्या माध्यमातून खाते अंतर्गत चौकशीमध्ये दोषी सिद्ध झाल्याने त्याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आला आहे..


















