एक्स्प्लोर
Advertisement
DC vs RR, Top 10 Key Points : राजस्थानचा दिल्लीवर विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
आयपीएलमधील आजच्या 34 व्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (DC vs RR) सामन्यात राजस्थानने दिल्लीवर धावांनी विजय मिळवला आहे.
DC vs RR, IPL 2022 : आयपीएलच्या आजच्या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला. दिल्ली 15 धावांनी पराभूत झाली असली तरी सामना अत्यंत चुरशीचा झाला. सामन्यात आधी जोस बटलर नावाचं वादळ मैदानात पाहायला मिळालं. बटलरने यंदाच्या हंगमातील तिसरं शतक झळकावलं . त्यामुळे राजस्थानने 223 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंत सर्वाधिक 44 धावा करु शकला. ललितने 37 धावांची तर पॉवेलने 36 धावांची खेळी केली. पण 223 धावाचं आव्हान पूर्ण होऊ न शकल्याने सामना दिल्लीने गमावला. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
DC vs RR 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. पण आज मात्र राजस्थानने नाणेफेक गमावून देखील सामना जिंकला, कारण त्यांनी एक भव्य असं लक्ष्य दिल्लीला दिलं होतं.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात राजस्थान संघाकडून सलामीवीर बटलरने झळकावलेलं एक अप्रतिम शतक संघासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. त्याने 65 चेंंडूत 116 धावा केल्या.
- बटलरला देवदत्तने देखील चांगली साथ दिली. त्याने 35 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकत 54 धावा केल्या.
- सामन्यात 46 धावांची तुफान खेळी कर्णधार संजू सॅमसनने केली. त्याने 19 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत 46 धावा झळकावल्या. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानने 222 धावांपर्यंत मजल मारली.
- राजस्थानने दमदार फलंदाजी केली खरी पण हे शक्य झालं दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या अतिशय खराब फलंदाजीमुळे. बहुतेक गोलंदाजांनी 40 हून अधिक धावा दिल्या.
- त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दिल्लीने सुरुवातीचे दोन विकेट 50 धावांच्या आतच गमावल्याने ही खराब सुरुवात त्यांना महाग पडली.
- त्यानंतर शॉ आणि पंतने डाव सांभाळला खरा पण शॉ बाद होताच, मोठा शॉट खेळण्याच्या नादात पंतही बाद झाला.
- त्यानंतर ललित आणि पॉवेलने डाव सांभाळला. पण दोघेही संघाला विजयापर्यंत घेऊ जाऊ शकले नाहीत.
- सामन्यात अत्यंत महत्त्वाची अशी ओव्हर म्हणजे 19 वी. आज राजस्थानच्या विजयात अतिशय महत्त्वाची ठरलेली ही ओव्हर प्रसिधने टाकली. विशेष म्हणजे त्याने ही निर्धाव टाकत सेट फलंदाज ललित यादवला त्याने बाद केलं.
- अखेरच्या षटकात दिल्ली जिंकण्याचे चान्सेस दिसत होते. 6 चेंडूत त्यांना 36 धावांची गरज असताना पॉवेलने सलग तीन षटकार ठोकले. पण तिसरा चेंडू नो असल्याचा दावा दिल्लीच्या ताफ्यातून झाला पण पंचानी नो बॉल न दिल्याने काही काळ सामन्यात व्यत्यय आला. पंतने तर फलंदाजांना माघारी बोलावलं होतं. पण इतरांच्या समजावण्यावरुन अखेर सामना सुरु ठेवला गेला. पण पॉवेल उर्वरीत चेंडूत 18 धावा न करु शकल्याने सामना दिल्लीने 15 धावांनी गमावला.
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement