एक्स्प्लोर
Pawar Politics: 'भाजपसोबत जाऊ नका', Sharad Pawar यांचा आदेश; Ajit Pawar गटासोबत युतीचे संकेत?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (Local Body Elections) मोठा निर्णय घेतला असून, यामुळे अजित पवार (Ajit Pawar) गटासोबतच्या संभाव्य समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. 'भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करायला शरद पवारांची राष्ट्रवादी तयार आहे,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पवारांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भूमिका मांडताना स्पष्ट केले की, काँग्रेस केवळ इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) घटक पक्षांसोबतच जाईल. तर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी, त्यांचा पक्ष महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) काय बदल होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















